आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MBA Pass Couple Set Up A Food Stall Outside The Kandivali Railway Station In Mumbai Reason Is Emotional

एमबीए पास दाम्पत्य रेल्वे स्टेशनवर चालवतात फूड स्टॉल; अत्यंत भावनिक आहे यामागचे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तुम्हाला जर रस्त्यावर एखाद्या सुशिक्षीत व्यक्तीने रस्त्यावर फूड स्टॉल लावलेला दिसला तर या माणसाने असा निर्णय का घेतला असा विचार तुमच्या मनात नक्कीच येत असेल. असेच काहीसे चित्र मुंबईतील कांदेवलीच्या रेल्वे स्टेशनवर दिसले. एक महिला गांधी जयंतीदिनी सकाळी काही चांगले खाण्यासाठी निघाली असता एक दाम्पत्य गाडीवर पोहे, इडली, पराठी आणि उपमाची विक्री करताना दिसले. ती महिला थांबली आणि या दाम्पत्याने असा निर्णय का घेतला याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

दीपाली भाटिया नावाच्या महिलेने ही संपूर्ण घटना आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. दीपाली यांनी सांगितले की, एमबीए पास एक दाम्पत्य पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनवर हा गाडा लावतात आणि यानंतर आपल्या नोकरीसाठी निघून जातात. दोघेही एमबीए असून दोघेही आपल्या नोकरीत आनंदी आहेत. यामुळे असं गाडी लावण्याचे त्यांच्याकडे विशेष कारण नाही. पण दाम्पत्याने यामागचे कारण सांगितल्यनंतर दीपाली हैराण झाल्या.  
 
जेव्हा दीपालीने त्यांना यामागचे कारण विचारले तर दाम्पत्याने सांगितले की, आपल्या 55 वर्षीय स्वयंपाकीणीची मदत करण्यासाठी फूड स्टॉल लावत असल्याचे सांगितले. स्वयंपाकीणीचा पती पॅरालाइज्ड आहे. यामुळे ती घरोघरी जाऊन स्वयंपाक करते. अशात हे दाम्पत्य स्वयंपाकीणीने तयार केलेल्या जेवणाची विक्री करण्यासाठी स्वतः सकाळी फूड स्टॉलवर जातात. 
 

बातम्या आणखी आहेत...