आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळून गेलेल्या युवक-युवतीला पोलिस ठाण्यात हजर करताच त्यांनी मीडियासमोर पोझ देत काढले फोटो आणि केले किस; सांगितले पळून जाण्याचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/रतलाम : रतलाम येथील सोन्याचे व्यापारी असलेल्या कुटुंबातील युवक-युवतीने पळून जाऊन लग्न केले. दोघेही 5 वर्षांपासून सोबत एमबीएचे शिक्षण घेत होते. मुलीच्या पित्याने लसूड़िया पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत पोलिसांनी मुलाच्या पित्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी वडिलांना  ताब्यात घेतल्याचे कळताच मुलगा आणि मुलगी पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि आम्ही आमच्या मर्जीने लग्न केल्याचे सांगितले. मुलांनी दिलेल्या विधानावरून पोलिसांनी मुलाच्या वडिलांची सुटका केली. 

 

पोलिस ठाण्यात सर्वांसमोर मुलीने मुलाला केले कीस 
- शशांक आणि रूपल यांनी प्रेमविवाह केला. कोर्टमॅरेज केल्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मीडियासमोर पोझ देत फोटो काढले. रूपलने तेथेच सर्वांसमोर शशांकला किस सुद्धा केले. एपी ज्वेलर्सचे अनिल पुरोहित यांचा 23 वर्षीय शंशाक आणि डीपी ज्वेलर्सचे राजेश कटारिया यांची 22 वर्षीय मुलगी रुपल इंदूर येथील प्रेस्टीज कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होते. दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी दोघांनी कोटा येथे कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. दरम्यान मी शंशाकसोबत स्वखुशीने लग्न केले असून आमच्या जीवाला धोका आहे. दोघांचे काही बरेवाईट झाल्यास त्यासाठी माझे कुटुंबीय जबाबदार असतील. माझ्या सासऱ्याला इंदूर पोलिसांना ताब्यात ठेवले आहे तरी त्यांना सोडून द्यावे अशाप्रकारचा अर्ज रुपलने मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात दिला. 

 

दोन्ही कुटुंबीयांचा पोलिस ठाण्यातच झाला वाद-विवाद

- 18 डिसेंबर रोजी रुपलच्या घरच्यांनी लसूड़िया पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखलीनंतर पोलिसांनी एपी ज्वेलर्सचे अनिल पुरोहित यांना रतलामवरून इंदूरला आणले. यानंतर पोलिसांनी दोघांच्या लग्नाविषयी सांगितले. शंशाकच्या वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांना इंदूर येथे बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यातच दोघांच्या परिवारामध्ये वाद-विवाद झाले. दरम्यान रुपलने मीडियासमोर सांगितले की, मी स्वखुशीने शंशाकसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. मला त्याच्यासोबत राहायचे आहे. तरी शंशाकच्या वडिलांची सुटका करण्यात यावी. युवक-युवतीने दिलेल्या विधानानंतर अनिल पुरोहित यांची पोलिसांनी सुटका केली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...