आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी काेम-निखत आज फायनल; विजेत्याला ट्रायलची मिळेल संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहा वेळची विश्वविजेती बाॅक्सर मेरी काेम आता आपल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या ट्रायलसाठी स्वत:ला सिद्ध करण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरणार आहे. ट्रायलच्या प्रकरणावरून तिच्यावर माेठ्या प्रमाणात टीका झाली हाेती. यासाठी तिला आता आज शनिवारी फायनल फाइट खेळावी लागेल. यात बाजी मारून तिचा प्रयत्न ऑलिम्पिक ट्रायलसाठीची पात्रता पुर्ण करण्याचा आहे. यासाठी तिच्या समाेर आज हाेणाऱ्या फायनलमध्ये निखत जरीनचे तगडे आव्हान असेल.  या फायनलमधील विजेत्या बाॅक्सरचा ऑलिम्पिक ट्रायलसाठी प्रवेश निश्चित हाेणार आहे. या दाेघींची नजर या विजयाकडे लागली आहे. अखिल भारतीय बाॅक्सिंग महासंघाच्या वतीने दाेन दिवसीय  आता महिलांच्या गटातील ट्रायलचे अयाेजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेच्या ५१ किलाे वजन गटाच्या सलामीलाच मेरी काेम आणि निखत जरीनला पराभवाचा सामना करावा लागला. या सलामीच्या फाइटलमध्ये रितूने सरस खेळीच्या बळावर मेरी काेमला पराभूत केले. दुसरीकडे ज्याेतीने जबरदस्त पंच मारून निखतला पराभूत केले.  सध्या आॅलिम्पिक  ट्रायलचे प्रकरण अधिकच चर्चेत राहिले आहे. यावरून मेरी काेम आणि महासंघाला टीकेला सामाेरे जावे लागले.