आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियातील लष्कराच्या माघारीवर नाराज मॅकगुर्क यांचा राजीनामा; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आणखी एक झटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय आघाडीच्या सैन्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत म्हणून आेळखले जाणारे ब्रेट मॅकगुर्क यांनी राजीनामा दिला आहे. सिरियातून सैन्य परत घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला त्यांचा आक्षेप होता, असा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.  

 

सिरियासारख्या भागात दहशतवाद्यांनी भलेही पळापळ करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांचा पूर्ण सफाया झाला आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. कारण दहशतवादी अद्याप पराभूत झालेले नाहीत. अशा परिस्थितीत अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावणे दहशतवादी कारवायांना चिथावणी देण्यासारखेच ठरणार आहे. खरे तर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लढाई सध्या चरम टप्प्प्यात आहे. त्यामुळेच सैनिकांची माघार योग्य नव्हती, असे मॅकगुर्क यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी मॅकगुर्क यांनी हेच म्हणणे मांडले होते. सिरियातून लष्कराला माघारी आणण्यावरून संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी गुरुवारी राजीनामा दिला होता. 

 

मॅटिस यांना दुसरी संधी दिली होती : ट्रम्प  
जेम्स मॅटिस यांना मी दुसऱ्यांदा संधी दिली होती. वास्तविक तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आेबामा यांनी मॅटिस यांना नाैदलातून जवळपासून काढून टाकले होते. मात्र मी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती. त्यांना संधी दिली जाऊ नये, असे काही लोकांना वाटत होते.  

बातम्या आणखी आहेत...