आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MDH मसालेचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांच्या निधनाची वार्ता समोर येताच कुटुंबियांनी जारी केला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एमडीएच मसाले कंपनीचे मालक आणि संस्थापक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी रविवारी दिल्लीत निधन झाले असे वृत्त देशभरातील माध्यमांनी जारी केले. परंतु, या वृत्ताच्या अवघ्या काही मिनिटांतच त्यांच्या कुटुंबियांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. तसेच महाशय गुलाटी सुखरूप असल्याचा दावा केला. सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांनी महाशय गुलाटी यांच्या निधनाची वार्ता जाहीर केली. तीच बड्या माध्यम संस्थांनी दाखवली असे कुटुंबियांनी स्पष्ट केले. जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मसाला किंग महाशय गुलाटी आपले दोन्ही हात उचलून आपण पूर्णपणे सुदृढ असल्याचा पुरावा देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर 6 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला आहे.

 

 

महाशियां दी हट्टी (एमडीएच) गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाला ब्रँड असून गुलाटी त्या ब्रँडचे सर्वात लोकप्रीय चेहरे आहेत. मसाल्याच्या प्रत्येक जाहिरातीत त्यांनी स्वतः काम केले. 1919 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेले गुलाटी यांनी 1947 नंतर भारतात स्थलांतरण केले. एका ठेलेवाल्यापासून त्यांनी अब्जावधी रुपयांचा मसाला एम्पायर उभा केला. 

 

बातम्या आणखी आहेत...