आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAN CARD क्रमांकात लपली आहे आपल्या नाव, व्यवसायासह संपूर्ण माहिती; जाणून घ्या कोणत्या कोडचा काय असतो अर्थ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - प्रत्येकाच्या पॅनकार्डला एक युनिक नंबर दिलेला असतो. बहुसंख्य लोकांना हे माहिती नसेल की हा नंबर रॅन्डम नसून त्यामध्ये समोरच्या व्यक्तीची माहिती असते. याच कोड वर्डमध्ये पॅनकार्ड धारकाचे नाव, अडनाव आणि व्यवसायासह खासगी माहिती नमूद केलेली असते. यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या क्रमांक आणि अल्फाबेटचा काय अर्थ असतो याची माहिती आम्ही देत आहोत.

 

अक्षरांमध्ये लपलेले असते आडनाव

पॅनकार्डवर कार्डधारकाचे नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असते. तसेच या नंबरमध्ये अडनाव देखील लपलेले असते. पॅनकार्डवरील पाचवे अक्षर तुमजे अडनाव दर्शवते. आयकर विभाग कार्डधारकाच्या अडनावाची त्यांच्या डेटाबेसमध्ये नोंद ठेवतात. आयकर विभाग याबाबतची कुठलीही माहिती कार्डधारकांना देत नाही. 

 

टॅक्स भरण्यापासून  क्रेडिट कार्डपर्यंत ठेवली जाते नजर

पॅनकार्डवर 10 अंकांचा एक नंबर असतो. तो लिमिटेड कार्डच्या स्वरुपात येतो. आयकर विभाग पॅनकार्डसाठी अर्ज दाखल केलेल्या लोकांनाच 10 अंकांचा नंबर प्रदान करते. पॅनकार्ड तयार झाल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटसोबत जोडले जातात. यामध्ये कर भरणा, क्रेडिट कार्डद्वारे होणारी आर्थिक देवाण-घेवाण सर्वकाही डिपार्टमेंटच्या देखरेखेखाली होत असते.

 

आयकर विभाग ठरवतो नंबर
पॅनकार्डवरील या 10 अंकी क्रमांकाचे सुरुवातीचे तीन डिजीट इंग्रजी मुळाक्षरे असतात. AAA पासून ते ZZZ पर्यंत कोणतेही मुळाक्षर असू शकतात. सध्या सुरू असलेल्या सिरीजनुसार ते ठरवले जाते. आयकर विभागाच्या सोयीनुसार हा नंबर ठरवला जातो. पॅनकार्डवरील क्रमांकाचे चौथे डिजीट सुद्धा इंग्रजी मुळाक्षर असते. पण, ते कार्डधारकाचे स्टेटस दर्शवते. 


हा असतो चौथ्या डिजीटचा अर्थ
P- एकटी व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (असोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन
G- गव्हर्नमेंटसाठी असतो

 

पाचव्या डिजीटचा असतो हा अर्थ

पॅनकार्डचा पाचवा डिजीट देखील एक इंग्रची मुळाक्षर असतो. हा डिजीट कार्डधारकाच्या आडनावाच्या सुरुवातीचे अक्षर असते. हे फक्त कार्डधारकावर अवलंबून असते. विशेष म्हणजे यामध्ये धारकाचे फक्त आडनावाच दर्शवले जाते. पॅनकार्डमध्ये चार नंबर असतात. 0001 ते 9999 पर्यंत कोणताही नंबर असू शकतो. पॅनकार्डवरील क्रमांकामध्ये शेवटचा डिजीट कोणताही एक अल्फाबेट डिजीट असतो. 

 

याठिकाणी महत्वाचे असते पॅनकार्ड

> पॅनकार्डच्या मदतीने विविध आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण करणे सोयिस्कर होते. पॅनकार्डच्या मदतीने बँक अकाउंट आणि डीमॅट अकाउंट उघडता येते.

> याशिवाय मालमत्तेची खरेदी-विक्री करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. खरं तर पॅनकार्ड टॅक्सेबल सॅलरी सोबत इनकम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक आहे.

> पॅनकार्डवर नाव आणि फोटो असल्यामुळे ओळखपत्र म्हणून काम करते. कारण तुमचा रहिवासी पत्ता बदलत असला तरी पॅनकार्ड नंबर तोच असतो.

 

बातम्या आणखी आहेत...