Home | Jeevan Mantra | Dharm | Measures Of Janmashtami 2018

दुर्भाग्य दूर करण्यासाठी श्रीकृष्णाला अर्पण करा या 6 पैकी कोणतीही एक गोष्ट

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 03:18 PM IST

श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

 • Measures Of Janmashtami 2018

  श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्रीमद्भागवतनुसार द्वापार युगात याच तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या वेळी 2 सप्टेंबरला स्मार्त संप्रदाय आणि 3 सप्टेंबरला वैष्णव संपद्रायचे लोक जन्माष्टमी साजरी करतील. या दिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला काही खास गोष्टी अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात...


  1. तुळस
  भगवान श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय आहे. यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्याही पदार्थाच्या नैवेद्य केला तरी त्यामध्ये तुळशीची पाने अवश्य टाकावीत.


  2. लोणी - खडीसाखर
  श्रीकृष्णाला कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता परंतु ताजे लोणी आणि खडीसाखर यांना विशेष प्रिय आहे.


  3. पिवळे वस्त्र
  श्रीकृष्णाला पीतांबरधारी असेही म्हणतात, याचा अर्थ पिवळे वस्त्र धारण करणारे. यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी यांना पिवळे वस्त्र अर्पण करावेत.


  4. पिवळे फळ
  जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळे फळ - केळी, आंबा इ. अर्पण केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Measures Of Janmashtami 2018

  5. पंचामृत
  गायीचे दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार केले जाते. श्रीकृष्णाला हे अत्यंत प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पंचामृत अवश्य अर्पण करावे.

 • Measures Of Janmashtami 2018

  6. मोरपंख
  जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला मोरपंख अर्पण करावा. यामुळे तुम्हाला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होऊ शकते.

Trending