आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोराेनामुळे मांसाहारी पदार्थ विक्रीमध्ये ४० टक्क्यांनी घट

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नाशिक - चीनसह जगातील विविध देशांत प्रसार झालेल्या कोराेना या अाजाराची बाधा मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे हाेत असल्याची  अफवा साेशल माध्यमांवर पसरल्याने मांसाहार टाळला जात असून यामुळे गेल्या काही दिवसात शहरातील मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय तब्बल ४० टक्क्यांनी घटला अाहे. मांसविक्रीवरही परिणाम झाला आहे.


 
कराेना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आराेग्य संचालकांनी  सरकारी रुग्णालये, महापालिका रुग्णालयात ठाेस उपाययाेजना करण्याचे अादेश दिले अाहेत. दुसरीकडे मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळेच या व्हायरसची बाधा हाेत असल्याचे संदेश व्हायरल झाल्याने बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम झाला अाहे. चिकन, मटन असे मांसाहारी पदार्थ खाण्याचे टाळले जात असल्याने या पदार्थांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली असून दरातही घसरण झाली अाहे. मांसाहारी खाद्यपदार्थ विक्री करणारे हाॅटेल, रेस्टॉरंट तसेच हातगाडी विक्रेत्यांचा व्यवसाय ३० ते ४० टक्के घटल्याने आधीच मंदीचा सामना करत असलेल्या व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे.


चिकन दरात घट,  मटणाचीही मागणी कम
ी :


डाॅक्टरांकडूनदेखील मांसाहारी पदार्थ खाण्याचे टाळावे असा सल्ला दिला जात असल्याने गेल्या तीन-चार दिवसांत चिकनच्या दरात माेठी घसरण झाली अाहे. बाॅयलर चिकन १८० रुपये किलाे दराने विक्री हाेत हाेते. मात्र सद्य:स्थितीत १२० ते १४० रुपये किलाे दराने विकले जात अाहे. मटणाचे भाव ६०० रुपये किलाे असले तरी मागणी ३० ते ४० टक्के घटल्याचे सांगण्यात आले

जनजागृती व प्रबाेधन :


कराेना व्हायरसचा प्रभाव लक्षात घेता शासकीय रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे. ठिकठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. चिकनच्या दरात माेठी घट

गेल्या काही दिवसांपासून चिकनची मागणी घटल्याने दरही घसरले आहेत. १८० किलाे ब्राॅयलर चिकनचे भाव १२०-१४० रुपयांवर आले आहे. या प्रकारामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. 
- नाजीम शेख सय्यद, चिकन विक्रेतेमटणाची मागणीही ४० टक्के कमी

कराेना व्हायरसच्या प्रभावामुळे मटणाच्या मागणीत ३० ते ४० टक्के घट झाली आहे. आधीच व्यवसायात मंदीचे वातावरण असताना या प्रकारामुळे अधिकच संकट काेसळले आहे.
- विनाेद लाड, मटन विक्रेतेजिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष

जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष व टीमची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयातील डाॅक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संशयित रुग्णांची  तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...