आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भरतपूर(राजस्थान)- येथील मेडीकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने कॉलेजातील असिस्टंट प्रोफेसरवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. महाविद्यालयात लैंगिक आत्याचाराची ही पहिली घटना आहे. पिडीत मुलगी एमबीबीएस प्रथम वर्षात शिकते. तिने आरोप लावला आहे की, असिस्टंट प्रोफेसरने तिला कॅबिनमध्ये बोलवले आणि वाईट पद्धतीने तिला स्पर्श करून छेडले.
प्रकरण भरतच्या एका मेडिकल कॉलेजमधील आहे. येथे एमबीबीएस करणाऱ्या एका विद्यार्थीनीने असिस्टंट प्रोफेसर डॉ. केएल मीणावर आरोप लावला. त्यानंतर कॉलेज प्रशानसनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेत 7 सदस्यांची कमेटी बसवून या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
तर असिस्टंट प्रोफेसर डॉ. केएल मीणाने सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणने आहे की, आरोप लावणारी मुलगी नेहमी क्लासमधून गायब असते. त्यांनी तिला समजुन सांगण्यासाठी कॅबिनमध्ये बोलवले होते इतर कोणतीही चर्चा त्यांच्यात झाली नाही. असिस्टेंट प्रोफेसर यांची पत्नी डॉ. कविता यादवदेखील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. त्यानी पतीच्या बाजुने बोलताना म्हणाल्या की, मुलीचे सगळे आरोप खोटे आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यानी खुप गदारोळ केला आणि नारेबाजी केली. त्यानंतर पोलसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण कॉलेजच्या प्राचार्यांचे म्हणने आहे की, हे आमच्या कॉलेजातील खासगी प्रकरण आहे त्यामुळे आम्ही याची चौकशी करूत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.