आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क - ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल अॅन्ड सायन्स (AIIMS) मध्ये गेल्या 24 तासांपासून अत्यावस्थ राहिलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले आहे. ते गेल्या 11 आठवड्यांपासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा झाली. तेव्हापासून त्यांना चालता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता असेही म्हटले जाते. त्यामुळे, वाजपेयींना नेमके काय झाले आणि त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार झाले याची माहिती DivyaMarathi.Com देत आहे.
2004 पासून चालणे-फिरणे बंद...
> 2000 मध्ये पंतप्रधान असताना वाजपेयी यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच रुग्णालयात त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. या सर्जरीनंतरही त्यांची प्रकृती आणखी बिघडत गेली. 2004 नंतर त्यांचे चालणे आणि फिरणे सीमित झाले.
> वाजपेयी यांचे अतिशय जवळचे मित्र राहिलेले एनएम घाटे म्हणाले होते, की "2009 मध्ये वाजपेयींना स्ट्रोक आला होता. तेव्हापासूनच त्यांना बोलण्याचा अडथळा निर्माण झाला. त्यांची ही कंडीशन दिवसेंदिवस आणखी बिघडली."
> वाजपेयी यांना स्मृतीभ्रंश झाला असे अनेकांनी म्हटले आहे. परंतु, त्यांना अलझायमर किंवा डिमेंशिया झाल्याचे अधिकृतरित्या कधीच जाहीर करण्यात आले नाही. 15 वर्षांपासून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर रणदीप गुलारिया यांनीही वाजपेयींना स्मृतीभ्रंश झाल्याचे वृत्त फेटाळले होते.
> वाजपेयींना गोड पदार्थ खूप आवडतात. परंतु, त्यांना मधुमेह, किडनी आणि मूत्राशयात संसर्ग असल्याने फक्त काही मोजक्या सण, उत्सवातच त्यांना गोड पदार्थ खाण्यासाठी दिले जात असे. त्याचे प्रमाण सुद्धा खूप कमी होती.
> याच वर्षी जूनमध्ये त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाजपेयी यांची एक किडनी बिघडली आहे. तर दुसऱ्या किडनी आणि मूत्राशयात संसर्ग झाला. यामुळेच, त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.