Maratha reservation / वैद्यकीय मराठा आरक्षण; आव्हान याचिका फेटाळली, वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

ओबीसी आरक्षणावरील याचिका नागपूर खंडपीठाने काढली निकाली

दिव्य मराठी

Jun 14,2019 08:53:00 AM IST

नागपूर - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आरक्षण लागू करण्यात आल्याने ते या वर्षी लागू करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्य सरकारने यावर अध्यादेश काढून १६ टक्के मराठा आरक्षण कायम ठेवण्याची तरतूद केली.

ओबीसी आरक्षणावरील याचिका निकाली
राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या केंद्रीय कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दाखल जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात हा विषय विचाराधीन असल्याच्या कारणास्तव नागपूर खंडपीठाने निकाली काढली.

X