आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटद्वारे अाॅनलाइन विक्रीस विराेध; औषधविक्रेते २८ सप्टेंबरला संपावर, सर्व मेडिकल राहणार बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बेकायदेशीररित्या इंटरनेटद्वारे ऑनलाईन अौषध विक्री आणि वितरण तसेच इ-पोर्टलच्या शासनाच्या धोरणाविरोधात २८ सप्टेंबरला संपूर्ण देशभर अखिल भारतीय औषधविक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नाशिक जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिशनही सहभागी होणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबराल नाशिकमध्येही सर्वच मेडिकल बंद राहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास औषधे उपलब्ध करून देण्यासाठी असोशिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे अाश्वासन दिले आहे.

 
ऑनलाइन पद्धतीने अौषधांची विक्रीचा व्यावसाय सध्या वेगात सुरू आहे. त्यात अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरास बंदी असलेली अौषधेही दिली जातात. त्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यास बंदी असून, या औषधांची विक्री केल्यास त्याचा हिशेब विक्रेत्याला द्यावा लागतो. परंतु ऑनलाइनवर असे कुठलेच निर्बध आढळून येत नाहीत. हा औषध विक्रेत्यांवर अन्याय आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात अखिल भारतीय अौषधविक्रेत्यांनी बंद पुकारला असून नाशिक जिल्ह्यातील विक्रेतेही त्यात सहभागी होणार असल्याची कल्पनाही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात अाली आहे. यावेळी असाेसिएशनचे अध्यक्ष अतुल अहिरे, सचिव राजेंद्र धामणे, रवींद्र पवार, योगेश बागरेचा, किरण छाजेड यांच्यासह जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...