आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यातील मेडिकल शॉपमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, दुकान मालकाचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • चोरीच्या उद्देशाने पहाटे 4 वाजता दुकानात घुसला चोर

ठाणे- ठाण्यात मेडिकल शॉपमध्ये झालेल्या गोळीबाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या उद्देशाने मेडिकल शॉपमध्ये घुसलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानात झोपलेल्या 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केला, यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा येथे घडली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
आज पाहटे 4 च्या सुमारास चोर कळवा परिसरातील वीर युवराज मेडिकल शॉपमध्ये घुसला. यावेळी दुकान मालक प्रेमसिंग उर्फ जितेंद्र सिंग मोतिसिंग राजपुरोहित झोपले होते. त्यांच्यावर चोराने 2 राउंड फायर केल्या. यात प्रेमसिंगचा मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावेळी चोराने दुकानातील सर्व कॅशही लुटून नेली आहे. पोलिसांनी प्रेमसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करुन मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.