आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कात्रज चौकात टेम्पोच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेप्मोने पाठीमागून धडक दिली

पुणे- पुण्यातील कात्रज चौकात एका भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटना आज(सोमवार) दुपारी 12.30 वाजता कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ घडली. एकता प्रभाकर कोठावदे(वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आज ती कात्रजहून स्वारगेटकडे येत असताना कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ पाठीमागून आलेल्या टेम्पोने तिला धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...