आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील आजारांमध्ये मानसिक ताणतणावाचे प्रमाण 86 टक्के आहे. जर अशीच स्थिती राहिली तर 2020 पर्यंत जास्तीत जास्त मृत्यू मानसिक रोगामुळे होतील. ध्यानधारणामुळे आपल्याला यापासून वाचता येते.

ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. जे चांगले आरोग्य, मन शांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे आपल्याला घेऊन जाते. आपण भूतकाळातील गोष्टी आणि भविष्याच्या चिंतेमुळे वर्तमानापासून दूर होत जातो. या दोन्ही गोष्टींमुळे आपण चिंता आणि तणावात गुरफटून जातो.

याचा काही अभ्यास
ध्यानाची सुरुवात आपण श्वासापासून करतो. ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपन शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते.

आत्मनिरीक्षण करा
सतत कामामुळे कधी कधी अस्वस्थ वाटू लागते. तेव्हा जवळपासच्या वातावरणातून स्वत:ला ऊर्जा मिळवता येते. जवळपास असलेले नैसर्गिक दृश्य जसे पाणी, फूल, झाड, पाने यावर नजर टाका. त्याला न्याहाळा. त्यांचा रंग, आकार यावर स्वत:च चर्चा करा. निर्सगाच्या सान्निध्यात आहात असे समजा.

स्मरणशक्ती वाढते
- ध्यानातून मिळवलेली भरपूर अाध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते.

संगीत ऐका
डोळे बंद करून एखादे संगीत ऐका. एखादे गाणे किंवा तुम्हाला आवडणारे गाणे डोळे बंद करून हेडफोन लावून ऐका. ते लक्षपूर्वक ऐका. ते कोणत्या संगीतकाराचे आहे किंवा कोणत्या गायकाने गायले ते सोडून फक्त संगीताचा आनंद घ्या. गाण्यात वापर करण्यात आलेल्या प्रत्येक वाद्याचा आनंद घ्या. त्याला लक्षपूर्वक ऐका. यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि निर्णयक्षमतादेखील वाढते.

झोपेचे तास कमी होतात
आपण दिवसभर काय कामे केलीत याचा एकदा पाढा वाचवा. यात आपण कोणत्या गोष्टीला जास्त वेळ दिला, कशाचा विचार केला याचे अवलोकन करावे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी रिपिट होणार नाहीत. शरीराला मिळणारी विश्राती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचेदेखील सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

मन आनंदी होते
कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी भरलेले असते. तथापि अाध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेली व्यक्ती जीवनातील पराभव अपमानांना लीलया तोंड देऊ शकते. वेदना सहन करण्याची, तिच्यावर मात करण्याची क्षमता तिच्यात येते. म्हणूनच ध्यान करणारी व्यक्ती नेहमी शांत व आनंदी असते.

कार्यक्षमता वाढते
आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत व मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात.

बातम्या आणखी आहेत...