आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 Sep 2018, मीन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीन राशी, 11 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.
 

पॉझिटिव्ह -  कामकाज आणि तुमची जबाबदारी वाढू शकते. नवीन ठिकाणी जाण्याचा योग आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. प्रेमी युगुलांना प्रेमसंबंधात यश मिळेल. डोक्यात विचारांचे काहूर माचण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदाच होईल. शक्य तितके प्रॅक्टिकल राहा. नोकरीत स्वतःच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करा. पैशांच्या कामासाठी लहान प्रवास करावा लागू शकतो.


निगेटिव्ह - ऑफिसमध्ये नशीबाची हवी तशी साथ तुम्हाला कदाचित मिळणार नाही. कामाच्या ताणामुळे तुम्ही स्वतःसाठी जास्त वेळ काढू शकणार नाहीत. थोडा त्रास जाणवेल. पैसे आणि गुंतवणूकीकडे गांभीर्याने बघा. नशीबाच्या भरोशावर राहिल्यास नुकसान होऊ शकते. शत्रूंपासून सावध राहा. या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बिझसनेसमध्ये पैसा थांबू शकतो. 


काय करावे - जेवणाच्या ताटातून एक चमचा भात काढून तो गायीला द्यावा.
 

लव्ह- लव्ह लाइफ चांगली राहील. पार्टनरकडून आनंद आणि प्रेम मिळेल. नवीन मित्र बनतील. 


करिअर-  नोकरीत तुमचा परफॉर्मन्स ठिकठाक राहील. एखाद्या अडचणीत सापडू शकता. नवीन ज्ञान आणि पुढे जाण्याचा शॉर्टकटसुद्धा मिळू शकतो. 


हेल्थ - मीन राशीच्या लोकांनी आपल्या तब्येतीची काळची घ्यावी.   

बातम्या आणखी आहेत...