आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही पुण्याची मोजणी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

८ जुलै ही बा.भ. बोरकर यांची पुण्यतिथी. ते निसर्ग कवी होते. अनेक मधुर भावगीतंही त्यांनी लिहिली. ललित लेखनही केले. पावलापुरता प्रकाश ही त्यांची आत्मकथा. वास्तविक बोरकर हे सर्वांना परिचित आहेत ते त्यांच्या प्रेमकवितांमुळे. परंतु ‘जिणे गंधौघाचे पाणी’सारखी अध्यात्माच्या वाटेनं जाणारी त्यांची  कविता अत्यंत निराळी आहे. त्यांचे कृष्णावर प्रेम होते. राधा-कृष्णावरील अनेक प्रेमकवितांमधून आपल्या हे लक्षात येते. कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करणाऱ्या एका मधुर गीतात ते म्हणतात,


माझ्या कानी बाई वाजे अलगूज
सांगो जाता तुज गुज सांगता न ये


(कृष्णाच्या प्रेमात वेडी झालेल्या राधेला तिच्या कानात कायम कृष्णाची मुरली ऐकू येते. पण दुसऱ्या कुणाला ती कशी ऐकू येणार? आणि कोणाला काय सांगणार?)
अगदी शालेय जीवनापासून बोरकरांचे कवितेशी नाते होते. कवी भा. रा. तांबे यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. बोरकरांना गोव्याचा खूप अभिमान होता. गोवा प्रेमाचे वर्णन करताना ते म्हणतात,


माझ्या  गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कडेकपारीमधून घट फुटतात दुधाचे


वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा प्रतिमा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. १९३४ मध्ये बडोदा इथल्या साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं. भारत सरकारनेही बोरकरांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. गोव्याच्या मातीतल्या या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या, खणखणीत आवाजाच्या आणि मुखात सतत कविता असणाऱ्या कवीला ही आदरांजली.
 

 

बातम्या आणखी आहेत...