आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meenakshi Seshadri Birthday, Meenakshi Seshadri Is Not In Limelight Today Meenakshi Birthday

दिग्दर्शकाने प्रपोज केल्यानंतर घाबरुन देश सोडून निघून गेली होती ही बॉलिवूड स्टार, बँकरसोबत केले लग्न, आता वयाच्या 55 व्या वर्षी चालवते डान्स क्लास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘दामिनी’, ‘हीरो’ आणि ‘घातक’ या सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने आज वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 नोव्हेंबर 1963 रोजी धनबाद येथे जन्मलेली मिनाक्षी 1996 साली रिलीज झालेल्या 'घातक' या सिनेमात शेवटची झळकली होती. त्यानंतर ती पेज थ्री पार्टीजमध्येही कधी दिसली नाही. अभिनेत्रीसोबत मिनाक्षी एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सरसुद्धा आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यासोबत काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर हे मोठे फिल्म स्टार्स तिचे हीरो होते.

 

हे होते फिल्मी करिअर सोडण्यामागचे कारण...
असे म्हटले जाते, की फिल्ममेकर राजकुमार संतोषी त्यांच्या प्रत्येक सिनेमात मिनाक्षीला हीरोईन म्हणून कास्ट करायचे. एकेदिवशी संतोषी यांनी मिनाक्षीकडे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. पण मिनाक्षीने त्यांचे प्रेम नाकारले. इतकेच नाही त्याचवेळी तिने बॉलिवूडलाही अलविदा केले आणि ती पदेशी निघून गेली.

 

इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत केले लग्न...

मिनाक्षीने 1995 साली इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) मध्ये स्थायिक झाली. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर्ड मॅरेज केले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव केंद्रा तर मुलाचे नाव जोश आहे. लग्नानंतर मिनाक्षी सिनेसृष्टीपासून कायमची दुरावली.

 

आता डान्स अॅकेडमी चालवते मिनाक्षी...

सिनेमा दुरावल्यानंतर मिनाक्षीने नृत्याची आवड जोपासली. टेक्सासमध्ये ती क्लासिकल डान्स शिकली. येथे तिन Cherish Dance School नावाने डान्स अॅकेडमी सुरु केली. टेक्सासमधील भारतीयांमध्ये मिनाक्षी लोकप्रिय आहे.

 

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी बनली मिस इंडिया...  

16 नोव्हेंबर 1963 रोजी (सिंदरी, झारखंड) मध्ये तामिळ कुटुंबात जन्मलेल्या मिनाक्षीने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केली. ‘पेंटर बाबू’ (1983) हा तिचा पहिली बॉलिवूड सिनेमा होता. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘हीरो’ या सिनेमाने. हा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. यामध्ये जॅकी श्रॉफ तिचे हीरो होते. आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षीने ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ हे गाजलेले सिनेमे दिले. 

 

चार नृत्य प्रकारात पारंगत आहे मिनाक्षी...  

मिनाक्षी चार नृत्यप्रकारात पारंगत आहे. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य प्रकार ती शिकली आहे. तिने वेम्पति चिन्ना सत्यम आणि जय रामाराव यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले.

 

कुमार सानूचे होते मिनाक्षीवर एकतर्फी प्रेम

गायक कुमार सानू मिनाक्षीच्या प्रेमात पडले होते. पण हे प्रेम एकतर्फी होते. 'जुर्म' या चित्रपटातील 'जब कोई बात बिगड़ जाए..' हे गाणे कुमार सानूने गायले होते. या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला मिनाक्षीसोबत कुमार सानूची भेट झाली होती. मिनाक्षीला बघताच क्षणी ते तिच्या प्रेमात पडले होते. पण हे नाते पुढे जाऊ शकले नाही.

 

या प्रमुख सिनेमांमध्ये झळकली मिनाक्षी... 

हीरो (1983), आवारा बाप (1985), बेवफाई (1985), मेरी जंग (1985), अल्ला रक्खा (1986), डकैत (1987), गंगा जमुना सरस्वती (1988), शंहशाह (1988), जोशीले (1989), जुर्म (1990), आज का गुंडाराज (1992), क्षत्रिय (1993), दामिनी (1993), घातक (1996). 

 

तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये केलंय काम...

1989 साली मिनाक्षीने 'मिस्टर इंडिया'चा या हिंदी सिनेमाचा रिमेक असलेल्या En Rathathin Rathame (1989) मध्ये काम केले. याशिवाय ती 'ब्रम्हर्षि विश्वामित्र' आणि 'आपद बंधावुडु' या तेलगू सिनेमांमध्येही झळकली. 

बातम्या आणखी आहेत...