आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथ सोहळ्यातून हातात सॅंडल घेऊन परतली मीरा राजपूत, सोशल मीडियावर झाली ट्रोलिंगची शिकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत स्टाइलच्या बाबतीत एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. पण अशातच ती मुंबई एअरपोर्टवर हातात सॅंडल घेऊन चालताना स्पॉट झाली. मीराचे हे फोटोज खूप व्हायरल होत आहेत. अनवाणी पायांनी चालण्यामुळे तिला सोशल मीडिया यूजर्स खूप ट्रोल करत आहेत.  

 

थकलेली दिसली मीरा... 
मीराचा हा फोटो तेव्हाच आहे जेव्हा ती दिल्लीहुन पीएम नरेंद्र मोदी यांच्या शपथ समारंभातून परतली होती. मुंबई एअरपोर्टवर तिच्यासोबत शाहिददेखील दिसला. मीरा अनवाणी पायाने चालत आहे. झाले असे की, दिल्लीमध्ये शपथ समारंभ आणि प्रवासामुळे ती ठाकली आणि त्याचमुळे तिने आपले हाय हील्स हातात घेतले आणि एअरपोर्टवर चालताना दिसली.  

 

काही म्हणाले ड्रामा काहींनी केले सपोर्ट... 
मीराचे हे फोटो व्हायरल होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. अनेकांना तिचे असे अनवाणी चालणे आवडले नाही  तर काहींनी तिची साथ दिली.  

 

अशा आल्या होत्या कमेंट... 
- एका यूजरने लिहिले, एवढ्या मोठ्या थकवणाऱ्या प्रवासासाठी मीराने आपल्यासोबत स्लिपर किंवा फ्लॅट फुटवेअर ठेवायला हवे होते. किती मुर्ख आहे ही, तिला न्यूज बनवायची होती का ? सामान्य लोकही थकतात पण ते कधी असे चालतात का #शेम #ड्रामा...
- दुसऱ्या एका यूजरने लिहिले, हे लोक जे काही करतात ती सर्व फॅशन असते.  
- सामान्य लोकही जेव्हा थकलेले असतात तेव्हा हेच करतात पण स्टारच्या पत्नीने ही नौटंकी केली तर अप्रूवल. ती तिथे गेलीच कशासाठी होती ? 
- तसेच एकाने लिहिले की, 'मी हे म्हणेन की ही तिची मर्जी आहे. प्रत्येक मुलगी हेच करते. कृपा करून एका फोटोचा एवढा मीठ तमाशा नका करू.  

बातम्या आणखी आहेत...