आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीयूत उपचार घेणाऱ्या महिलेवर रुग्णालय स्टाफकडून सामुहिक बलात्कार, एका महिलेसह 5 जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - उत्तर प्रदेशच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर स्टाफने सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने तिला मेरठ येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिला झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि चार पुरुष अशा 5 जणांना अटक केली आहे. त्या सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.


घटनेच्या वेळी बंद केले होते रुग्णालयातील सीसीटीव्ही
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठच्या एका विवाहितेला श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला आयसीयूत दाखल होण्याचा सल्ला दिला. याच ठिकाणी तिला आरामासाठी झोपेचे इंजेक्शन देण्यात आले. झोपेत असतानाच रुग्णालयाच्या स्टाफने तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. यानंतर एक-एक करून 4 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारात स्टाफच्या एका महिलेचा देखील हात आहे. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा काही तासांचे फुटेज गायब असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सविस्तर तपास करण्यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...