आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे हा मुलगा जो अफगाणिस्तानविरुद्ध मॅच ड्रॉ झाल्याने रडला होता ढसा-ढसा, या मुलाला भुवीने केला फोन तर राशिदने घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क: आशिया कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानसोबत ड्रॉ सामना खेळला, कोणाला अपेक्षित नव्हते की, अफगाणिस्तान टीम इंडियाला बॅकफुटवर ठकलेल. एका मुलालाही अपेक्षित नव्हते, जो मॅचमध्ये शेवटची विकेट पडताच ढसा-ढसा रडू लागला. या मुलाचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे. या मुलाचे नाव अर्जन आहे,  जो आपल्या वडिलांबरोबर मॅच पाहण्यासाठी गेला होता. अर्जन क्रिकेटचा खुप मोठा फॅन आहे आणि स्वत: देखील क्रिकेट खेळतो.

 

अर्जनला भुवनेश्वरने केला फोन, रशिने घेतली भेट 
सोशल मीडियावर अर्जनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरभजन सिंहने ट्वीट केले, ट्वीट करुन म्हणाला- 'कोई नई पुत्तर, फायनल हम ही जीतेंगे', तसेच भुवनेश्वर कुमारने फोन करुन हसवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचा स्टार प्लेअर राशिद खान आणि शहजादनेही मुलाची भेट घेतली. शुक्रवारी आशिया कपची फायनल मॅच आहे. ज्यामध्ये भारतासमोर बांगलादेशची टीम असेल, अर्जन फायनल मॅचही पाहायला जाणार आहे. अर्जननुसार, त्याला अपेक्षा आहे की, भारत ही मॅच नक्कीच जिंकेल.

बातम्या आणखी आहेत...