आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meet Manju Devi The Lady Who Does Postmortem In Bihar On Just 100 Rupees Wages

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आतापर्यंत 13 हजारांहून अधिक मृतदेहांची चिरफाड केलेली आहे या महिलेने, 108 रुपये रोजावर करते काम, 5 मुलांची आहे आई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्तीपूर (बिहार) - आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची ओळख करून देत आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यात 13 हजारांहून अधिक मृतदेहांची चिरफाड केलेली आहे. चकित झालात ना! परंतु हे सर्व सत्य आहे. तसे पाहिले तर पोस्टमार्टम हाऊसमध्ये फक्त पुरुष कर्मचारीच पाहायला मिळतात. परंतु बिहारच्या मंजू देवी 14 वर्षांपासून असिस्टंट म्हणून मृतदेहांच्या पोस्टमार्टमचे काम करत आहेत. एवढेच नाही, जर मंजू देवी एखाद्या दिवशी कामावर नसल्या, तर पोस्टमार्टमचे काम थांबते. यावरून दिसते की, त्या आपल्या कामात किती निष्णात आहेत.

 

एका दिवसाची मजुरी 108 रुपये
- समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी 45 वर्षीय मंजू देवी यांना पर डे 108 रुपये मिळतात. दुसरीकडे, एखाद्या दिवशी डेडबॉडी आलीच नाही, तर त्यांना हे पैसे मिळत नाहीत.
- मजुरी वाढवण्यासाठी आणि नोकरी पक्की करण्यासाठी मंजू देवींनी डॉक्टर व रुग्णालय अधीक्षकांना अनेकदा विनवणी केलेली आहे. परंतु काहीच फायदा झाला नाही. त्या म्हणतात की, पैसेही वेळेवर मिळत नाहीत. 
- मंजू देवी सांगतात, 2008 मध्ये त्यांनी डीएम व सीएसविरुद्ध पाटणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती, याच्या एका वर्षानंतर कोर्टाने त्यांच्या बाजूने आदेश दिला.
- तथापि, हे प्रकरण अजूनही जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. यावर अॅडिशनल कलेक्टर बाल मुकुंद प्रसाद म्हणाले की, कोर्टाच्या आदेशाचे पालन होईल.
- पोस्टमार्टम हाऊसमध्ये सोबत असणारे ऑर्थोपेडिक डॉ. डी. के. शर्माही म्हणाले की, मंजू आपल्या कामात तरबेज आहेत.

 

उगाच नाही सुरू केले चिरफाडचे काम
- मंजू देवींचे सासरे रामजी मल्लिकही पोस्टमार्टम हाऊसमध्ये काम करायचे. 24 वर्षांपूर्वी 1994 मध्ये त्यांच्या निधनानंतर पत्नी भोला देवींना कामावर ठेवण्यात आले.
- 17 वर्षांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर मंजू देवीही सासूसोबत पोस्टमार्टम हाऊसमध्ये जाऊ लागल्या. हळूहळू त्यांनीही चिरफाड करण्याचे काम शिकून घेतले.
- याच कारणामुळे 14 वर्षांपूर्वी सासूच्या मृत्यूनंतर मंजू देवींना पोस्टमार्टम हाऊसमध्ये रोजंदारीच्या हिशेबाने नोकरी मिळाली. आता हेच मंजू देवींच्या कमाईचे साधन आहे.
- त्या सांगतात की, सुरुवातीला मला भीती वाटायची, परंतु घराचीही जबाबदारी होती. यामुळे सर्वकाही विसरून भीती दूर करावी लागली.

 

आता मोठा मुलगाही करतोय मदत
- मंजू देवींना 5 मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा दीपक 27 वर्षांचा आहे. आता तोही आईची पोस्टमार्टममध्ये मदत करतोय.
- दुसरीकडे, एका मुलीचे लग्नही त्यांनी याच कमाईच्या जोरावर केले आहे. तिसरा मुलगा संगीताचे शिक्षण घेतोय. मंजू देवींना दोन जुळ्या मुलीही आहेत. त्या दोघीही आता उपवर झाल्या आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...