आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा मुरादाबादच्या SSP ला, पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादींना मिळते मोफत कॉफी, बदलली पोलिसांची प्रतिमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुरादाबाद: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये पोलिस मित्राच्या रुपात समोर येत आहेत. येथे पोलिस पब्लिक फ्रेंडली वागताना दिसत आहेत. फिर्यादींना चांगली वागणूक दिल्याने पोलिस चर्चेत आले आहेत. यामागे एसएसपी जे. रविंद्र गौड यांचा वाटा आहे. वरिष्ठ पोलिस अधिक्षक  (एसएसपी) जे. रवींद्र गौड यांनी पोलिस कर्मचा-यांना स्टेशनमध्ये येणा-या फिर्यादींसोबत शालिनता आणि प्रेमाने वागण्याचे आदेश दिले आहेत. जनपथच्या स्टेशनला अशा पद्धतीने सजवण्यात आले आहे, जेणेकरुन येथे येणा-या तक्रारकर्त्यांना आपल्या घरासारखे वाटावे. सर्व पोलिस कर्मचा-यांना लोकांशी प्रेमाने वागण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. 

 

यासाठी एसएसपीने अनेक महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांनी फिर्यादींसाठी पोलिस स्टेशनमध्ये गरजेच्या सुविधा पुरवल्या, सोबतच जनपथच्या सर्व पोलिस स्टेशनचे रंगरुप बदलले. कुठलीही अडचण असल्यास तत्काळ पोलिसांची मदत घेण्यासाठी जिल्ह्यातील जनतेला वेळोवेळी अपील केली जात आहे. शिवाय पोलिसांसाठी सेमिनार आयोजित करुन जनतेसोबत शालिनता आणि प्रेमाने वागण्याची त्यांना ताकिद दिली जात आहे. लोकांमध्ये पोलिसांची असलेली प्रतिमा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. शिवाय पोलिसांचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढवण्यावरही भर दिला जात आहे. 

 

पोलिसांची ही कार्यप्रणाली बघून लोक हैराणदेखील आहेत, पोलिसांमध्ये एवढा बदल कसा झाला? असा प्रश्नही त्यांच्या मनात येतोय. या बदलासाठी डीजीपींनी आदेश काढले होते की, पोलिसांनी जनतेविषयी सहानुभूती दाखवावी आणि आपल्या वर्तणुकीतून लोकांमध्ये पोलिसांची एक चांगली प्रतिमा निर्माण करावी.

 

एसएसपींनी या बदलाच्या दिशेला नवीन पंख दिले आणि आज जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे रुप पालटले आहे. फिर्यादींना मोफत कॉफी आणि वायफायसोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

पोलिसांच्या कडक वागणुकीमुळे लोक पोलिसांना त्यांच्या अडचणी सांगण्यास घाबरत होते. त्यामुळे लोकांमधील ही भीती दूर करण्यासाठी एसएसपींनी हा उपक्रम राबवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...