आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक फिल्म्समध्ये अमिताभच्या बालपणीची भूमिकेत झळकला हा अॅक्टर, आता अभिनयापासून दूर या फिल्डमध्ये कमावले नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमिताभ बच्चन यांच्या 1983 साली रिलीज झालेल्या 'कुली' या सिनेमात त्यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार तुम्हाला आठवतोय का... मास्टर रवी या नावाने प्रसिद्ध असलेला हा बालकलाकार आता 47 वर्षांचा झाला आहे. मास्टर रवी या नावानेच हा कलाकार 1977 साली रिलीज झालेल्या 'अमर अकबर अँथोनी' या सिनेमातसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिकेत झळकला होता. 6 जून 1971 रोजी जन्मलेल्या मास्टर रवीने 1976 साली आलेल्या 'फकीरा' या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रवी यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमधील सुमारे 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. मास्टर रवीचे पूर्ण नाव रवी वलेचा असे आहे.


आता हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत काम करतात रवी वलेचा...
- तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मास्टर रवी, रवी वलेचा या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मास्टर इन हॉस्पिटॅलिटी अँड इंटरनॅशनल बिजनेस या विषयात एमबीए केले आहे. 
- रवी वलेचा आज हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. ते आता भारतातील प्रायव्हेट सेक्टरमधील टॉप बँकमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे काम सांभाळत आहेत. 
- इतकेच नाही तर ज्यांना हॉस्पिटॅलिटी फिल्डमध्ये करिअर करायचे आहे, त्यांना रवी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि इतर स्किल्सचे ट्रेनिंगसुद्धा देतात.


शूटिंगच्या काळात अभ्यासाला मिळायचा नाही वेळ... 
एका मुलाखतीत रवी वलेचा यांनी सांगितले, की बालपणी शूटिंगच्या काळात त्यांना अभ्यासासाठी मुळीच वेळ मिळायचा नाही. त्यामुळे त्यांनी बेसिक शिक्षण घेऊन नंतर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा कोर्स केला.


प्रोफेशनली स्थिरस्थावर झाले आहेत रवी...
- रवी वलेचा सांगतात, की मी प्रोफेशनली स्थिरस्थावर झालोय. पण भविष्यात पुन्हा सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, तर पुन्हा काम करायला नक्की आवडेल.
- अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याविषयी रवी म्हणतात, की त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही कधीही स्वतःला लहान किंवा बालकलाकार समजणार नाही.  


या सिनेमांमध्ये साकारली बिग बींच्या बालपणीची भूमिका..
रवी वलेचा उर्फ मास्टर रवी यांनी 'अमर अकबर एंथोनी' (1977), देश प्रेमी (1982), शक्ति (1982) आणि कुली (1983) या सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका वठवली होती. 

 

रवी वलेचा यांनी या सिनेमांमध्ये केलंय काम...
- दो चेहरे (1977), मिस्टर नटवरलाल (1979), जमाने को दिखाना है (1982), हादसा (1983), पाखंडी (1984), गिरफ्तार (1985), प्रोफेसर की पडोसन (1993) या सिनेमांमध्ये रवी झळकले आहेत.


'शांती' मालिकेतही झळकले... 
-  90च्या दशकात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'शांती' या मालिकेच्या दोन एपिसोडमध्ये रवी झळकले आहेत. त्यांना दिग्दर्शनाची आवड असल्याचे ते सांगतात. 
- भाविका वलेचा हे रवी यांच्या पत्नीचे नाव आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...