Home | Gossip | Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

शाहिदची Family: शाहिदला एक दोन नव्हे तर, तीन-तीन आईवडील, सख्ख्या आईचे एकही लग्न टिकले नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 05:11 PM IST

दोन मुलांचा बाबा झालेल्या शाहिदला तीन वडील आणि तीन आई असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?

 • Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

  एन्टटेन्मेंट डेस्क : शाहिद कपूर दूस-यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी मीरा राजपूत हिने 5 सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोघांना दोन वर्षांची मुलगी मीशा आहे. ती आता दोन वर्षांची झाली आहे. शाहिदच्या घरात चिमुकल्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण आहे. दोन मुलांचा बाबा झालेल्या शाहिदला तीन वडील आणि तीन आई असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही विचार करत असाल की, असे कसे? तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत.

  पंकज कपूर आणि नीलिमा अजीम
  शाहिद अभिनेता पंकज कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. पंकज त्याचे बायोलॉजिकल वडील आहेत. 1975 मध्ये पंकज आणि नीलिमा यांचे लग्न झाले होते. मात्र शाहिदच्या जन्माच्या तीन वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.


  पुढे वाचा, घटस्फोटाच्या पाच वर्षांनी पंकज कपूर यांनी केले दुसरे लग्न...

 • Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

  पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक

  पंकज कपूर यांनी नीलिमा यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर पाच वर्षांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकसोबत लग्न केले. सुप्रिया-पंकज यांना दोन मुले असून सनाह आणि रुहान कपूर ही त्यांची नावे आहेत. सुप्रिया शाहिदची सावत्र आई आहे. 


  पुढे वाचा, नीलिमा यांनीही थाटला दुसरा संसार...

 • Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

  नीलिमा अजीम आणि राजेश खट्टर

  दुसरीकडे नीलिमा यांनी टीव्ही अभिनेता राजेश खट्टरसोबत 1990 मध्ये दुसरे लग्न केले. मात्र पहिल्या लग्नाप्रमाणेच हे लग्नही फार काळ टिकले नाही. लग्नाच्या अकरा वर्षांनी म्हणजे 1990 मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा घटस्फोट झाला. नीलिमा आणि राजेश यांचा एक मुलगा असून इशान खट्टर हे त्याचे नाव आहे. 

   

  नीलिमा यांचे तिसरे लग्नही ठरले अपयशी..

 • Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

  नीलिमा अजीम आणि उस्ताद राजा अली खान

  राजेश खट्टर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलिमा यांनी उस्ताद राजा अली खानसोबत तिस-यांदा लग्न केले. मात्र दुर्दैवाने हे लग्नही फार काळ टिकले नाही. 

 • Meet Shahid Kapoors 3 Fathers And 3 Mothers

  राजेश खट्टर आणि वंदना सजनानी
  नीलिमा यांच्यापासून विभक्तझाल्यानंतर राजेश यांनी अभिनेत्री वंदना सजनानीसोबत 2007 मध्ये लग्न केले.

   

Trending