आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना सापडला नाही या तरुणीच्या आजारावर उपचार, जगात फक्त 35 रुग्ण, रडली तरी जळू लागते स्किन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची राहणारी निया सेल्वे रोज वेदना सहन करते पण ती रडूही शकत नाही. त्याचे कारण म्हणजे तिला असलेला दुर्मिळ आजार. 21 वर्षांच्या नियाला पाण्याची अॅलर्जी आहे. त्वचेला जराही पाणी लागले तरी तिला त्रास व्हायला लागतो. तिच्या त्वचेवर रॅशेस होतात. त्वचेवरील छिद्रातून हीट निघते आणि तिला ती जाणवू लागते. डॉक्टर्सचा दावा आहे की, जगात असा आजार असलेले फक्त 35 जण आहेत. त्यांना 'अॅक्वाजेनिक अर्टिकारिया' आजार आहे. 


कायम हसत राहा 
- निया म्हणली की, ती जणू एका काळ्या स्वप्नात जगत आहे. जेव्हा ती पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा त्वचेला जळजळ होऊ लागते. तिला प्रचंड वेदना होतात. पण कोणी काही करू शकत नाही. कायम हसत राहावे लागते. कारण रडले की तिला त्रास सुरू होतो. 
- हा आजात तिला पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू झाला होता. पण आतापर्यंत यामागचे कारण समजलेले नाही. तिचे मित्र पावसात मजा लुटतात, स्विमिग पूलमध्ये अंघोळ करतात, पण ती फक्त त्यांना पाहत राहते. 
- सुरुवातीला तिला तिच्या आजाराबाबत माहिती नव्हते. पण तिने याबाबत इंटरनेटवर शोध घ्यायाला सुरुवात करताच अमेरिका आणि इतर देशांमधील असे दुर्मिळ प्रकार तिला समजले. स्किन एक्सपर्ट्सने या आजाराचे नाव 'अॅक्वाजेनिक अर्टिकारिया' असे सांगितले आहे. दुर्दैवाने यावर उपचार नाही. 

बातम्या आणखी आहेत...