आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meet The Lady Who Has Been Baking Birthday Cakes For Salman Khan Since 2012

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानसाठी अनेक वर्षांपासून बर्थडे केक बनवत आहे ही महिला, प्रत्येकवर्षी कधी 50 तर 20KG चा केक फार्महाउसवर करते डिलीव्हर, आजपर्यंत होऊ शकली नाही सलमानशी भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सलमान खान पनवेल येथील फार्म हाउमध्ये ग्रँड बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करतो. प्रत्येक वर्षी त्याच्या बर्थडे केकचे फँसी फोटोज मीडियामध्ये येत असतात. पण तुम्हाला माहिती नसेल की, हे केक एक महिला 2012 पासून बनवत आहे. या महिला सेलिब्रिटी बेकरचे नाव पूजा ढींगरा आहे. मुंबईमध्ये  Le15 Patisserie नावाचे तिचे शॉप आहे. ते 6 वर्षांपासून दबंग खानसाठी केक डिझाइन करतेय. आमच्या वेबसाइटसोबत बोलताना पूजाने सांगितले की, "पहिल्यांदा मी सलमानसाठी 2012 मध्ये केक डिझाइन केला होता. त्यांची बहीण अर्पिताने मला अप्रोच केले होते आणि डिझाइन कशी हवी याविषयी सांगितले होते. प्रत्येकवर्षी अर्पिता मला कॉल करते आणि थीमनुसार केक ऑर्डर करते." विचित्र गोष्ट म्हणजे 6 वर्षांपासून पूजा सलमानसाठी केक तयार करतेय. पण तिला अजूनही सलमानला भेटण्याची संधी मिळालेली नाही. ती म्हणते की, "आम्ही पनवेलच्या फार्म हाउसवर केक पाठवतो, पण आजपर्यंत मी त्यांना भेटलेले नाही. मी फक्त माझे काम करते आणि विसरुन जाते. फक्त अर्पितासोबत माझे बोलणे होते."

 

जेव्हा पूजाने बनवला होता 50 किलोंचा केक... 
- पूजाने पुढे मुलाखतीत सांगितले की, "फ्लेवरविषयी बोलायचे झाले तर सलमानला फ्रूट आणि क्रीम केक आवडतो. यावर्षी पूजाने स्ट्रॉबेरी आणि केरामल दोन फ्लेवरचा केक बनवला होता. हा केक 20 किलोंचा होता. केकवर सलमानच्या मूव्हीजचे पोस्टर होते, यामध्ये टायगर, वॉन्टेड, दबंग, अंदाज अपना अपना यांचा समावेश होता. या केकवर फिरोजा ब्रेसलेटही होता, सलमान नेहमी हे आपल्या हातात घालतात."
पूजा पुढे म्हणाली की, "सलमानच्या 50 व्या वाढदिवसाचा केक बनवणे सर्वात कठीण होते. हा केक 50 किलोंचा होता. यामध्ये आम्ही तीन ब्लॉक बनवले होते. हे टॉपवर होते आणि एकमेकांना बॅलेंस करत होते."

 

हे सेलिब्रिटीज आहेत पूजाचे क्लाइंट्स 
- पूजाच्या सेलिब्रिटी क्लाइंट्समध्ये सलमानसोबतच सोनम कपूर, आलिया भट, दीपिका पदुकोण, शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे. तिने प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या इव्हेंटसाठीही केक डिझाइन केला होता. येथे दोघं गेस्ट म्हणून आले होते. 
- निकच्या इच्छेनुसार पूजाने केकवर  Vogue मॅग्झिनचे कव्हर पेज बनवले होते. यावर प्रियांकाचा फोटो होता. पूजाने सोनम आणि आनंद आहूजाचा वेडिंग केकही डिझाइन केला होता. 
(ओंकार कुलकर्णी रिपोर्ट)