आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळांसाठीच्या अटी, डीजेवरील निर्बंध न हटविल्यास रस्त्यावरच गणेश स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गणेशाेत्सव मंडळांसाठी महापालिकेने लादलेल्या जाचक अटी अाणि डीजेवरील निर्बंध न हटविल्यास शहरातील सर्व गणेश मंडळे रस्त्यावर उतरतील, वेळप्रसंगी रस्त्यावरच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा गणेशाेत्सव महामंडळाच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी महामंडळाच्या विविध समित्यांचे गठण करण्यात अले.


चाेपडा बॅन्क्वेट हाॅलमध्ये झालेल्या या बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अापले गाऱ्हाणे मांडले. गणेश मंडळांमध्ये एकजूट सल्यामुळे त्याचा फायदा प्रशासनातील अधिकारी घेतात. यापुढील काळात मंडळांचे प्रश्न एकीने साेडविण्याचा ठराव यावेळी करण्यात अाला. महामंडळाच्या विविध समित्यांतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी करण्यात येऊन संबंधित पदाधिकाऱ्यांनी अापल्या विभागातील मंडळांना एकत्र अाणायचे अाहे, असे बैठकीत सांगण्यात अाले. अध्यक्षीय भाषणात समीर शेटे यांनी सांगितले की, प्रशासनाला मंडळांची ताकद दाखवून देण्याची वेळ अाली अाहे. पुणे अाणि मुंबईसाठी जाे न्याय दिला जाताे ताेच नाशिकलाही देणे गरजेचे अाहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असल्याने येथे प्रश्न उद‌्भवायलाच नकाे हाेते. मंडळांची संख्या वाढवून अापली ताकद दाखवून देऊ, असे अावाहनही शेटे यांनी केले. नंदन भास्करे यांनी सूत्रसंचालन व शंकर बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण जाधव यांनी अाभार मानले.

 

देणगी मागणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यास घाबरू नका : गजानन शेलार
काेलकाेत्यात दुर्गापूजेला विराेध हाेत असेल तर अाम्ही मंत्रालयात घुसून ताेडफाेड करू, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला अाहे. त्याच धर्तीवर येथील सरकारलाही जागे करण्याचे काम तुमचे-अामचे अाहे असे सांगत गजानन शेलार म्हणाले की, दिवंगत नेते निहाल अहमद यांना सभेला परवानगी नाकारली जायची त्यावेळी हवेत खुर्ची बांधून ते सभा घ्यायचे. महापालिकेने अापल्या अटी-शर्ती शिथिल केल्याच नाही तर मंडपही हवेत बांधण्यास अाम्ही मागेपुढे पाहणार नाही. गेल्यावेळी सत्यम खंडाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. पण त्याने घाबरायचे नाही. अापण बाप्पासाठी काम करताे. वर्षातून एकदा थाेडीफार देणगी दिली तर तुमची हंडी रिती हाेणार नाही. देणगीदाराने सढळ हाताने ती द्यावी अाणि कार्यकर्त्यांनीही जबरदस्ती न करता प्रेमाने मागावी. गेल्यावेळी डीजेवरून झालेल्या वादामुळे मी घाबरलाे, असा समज जर कुणी केला असेल तर ताे काढून टाका. जाे काेणाला घाबरत नाही ताे गजानन असताे, असेही शेलार म्हणाले.

 

बैठकीतील मुद्दे
बी. डी. भालेकर मैदानावरील परंपरा माेडू नये मिरवणुकीत मंडळांना लवकर नंबर मिळावे पाेलिस मॅरेथाॅनला काेणत्या कायद्याप्रमाणे डीजेचा वापर केला; उपस्थितांनी विचारला प्रश्न पुण्याप्रमाणे नाशिकमधील मंडळाचाही दबावगट तयार व्हावा.

 

अायुक्त हुकूमशहा
अायुक्तांना 'हुकूमशहा' संबाेधत प्रत्येक उत्सवांमध्ये माेडता घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हाच याेग्य उपाय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...