आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Meeting New People Reveals That Although The Languages Are Different, The Emotions Are The Same Comedian Balraj

नवीन लोकांना भेटून कळले की भाषा भिन्न असल्या तरी भावना त्याच आहेत - कॉमेडियन बलराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : या मुलाखतीमध्ये बलराजने आपल्या ग्रीस आणि इस्तंबूलमधील सहलीचे अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितले की, या प्रवासादरम्यान त्याने १६ वेगवेगळ्या शहरांचा फेरफटला मारला. त्याच्या मुलाखतीचा मुख्य अंश...

'खतरों के खिलाड़ी'ची शूटिंग करून आल्यानंतर खूप थकवा जा‌णवत होता. आता कुठेतरी फिरायला जावे, असे वाटत होते. मला तर जायचेच होते तितक्यात ग्रीसमध्ये चित्रपट महोत्सव होत असल्याचे कळले. तिथे गेलो. तुर्कस्तान आणि ग्रीस शेजारीच आहेत. फ्लाइटपासून सुमारे दीड तासांचे अतर असावे. ग्रीसचा व्हिसा मिळाला असेल तर तुर्कस्तानचा व्हिसा ऑनलाइन सहज मिळतो. त्यामुळे चार ते पाच दिवसांचा तुर्कस्तानचा दौराही आखला. ग्रीसमधील रस्त्याच्या कडेला छोट्या-छोट्या चर्चसह अनेक चर्च आहेत. तुर्कस्तानातील बकलावा मिठाई आणि टर्की-टी प्रसिद्ध आहे. तिथे सुंदर स्कार्फही मिळतात.

माणसाने आयुष्यात एकदा तरी इथे यावे, असा हा सुंदर देश आहे. कारण आपण जेव्हा नवीन लोकांना भेटतो, नवीन संस्कृती पाहतो तेव्हा आपली भाषाच फक्त वेगळी असते, पण सर्वांच्या भावना एकसारख्याच आहेत, हेदेखील कळते.

मी एकट्यानेच ग्रीस आणि इस्तंबूलची सहल केली. १ नोव्हेंबर रोजी जायचे होते, परंतु आजारी असल्याने काही दिवसांनंतर जाणे झाले. ग्रीसमधील थेसानोनिकी या शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. याच शहरात ६८वा अथेन्स-थेसानोनिकी फिल्म फेस्टिव्हल सुरू होता. इथे मला उत्तम चित्रपटही पाहायला मिळाले. तेथील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि लोकांची भेट घेतली. त्यानंतर तेथून थेट इस्तंबूलला गेलो. इस्तंबूलमध्ये दोन-तीन दिवस फिरलो. तेथील पूल पाहिला. या पुलाचा एक किनारा आशिया आणि दुसरा युरोपमध्ये येतो. दोन खंडांना जोडणारा हा एकमेव पूल आहे.

तेथून कॅप्पाडोकियाला गेलो. हे खूपच सुंदर शहर आहे. तेथील हॉटेल्स नैसर्गिक गुहेत बनवले आहेत. बाहेर शून्य डिग्री तापमान आणि आतील खोली गरम असते. कारण या गुहा नैसर्गिक आहेत. तिथे हॉट एअर बलूनची स्वारी केली आणि केव्ह हॉटेलमध्ये थांबलो. नंतर तेथून पामूकालेला गेलो. एकेकाळी इथे रोमनने वसवलेले शहर होते. तिथेच पांढऱ्या दगडाचे डोंगरही आहेत.

यानंतर तुर्कस्तानातील एंटाल्या इथे जाऊन सायकलिंग केली. या सहलीमध्ये ग्रीसमधील शहरांचा फेरफटका मारत तेथील जेवणाचा आस्वाद घेतला. तुर्की संस्कृती भारतीय संस्कृतीशी खूप मिळतीजुळती आहे. तिथेही जेवणात भरपूर मसाले वापरतात. येथील लोकांना गोड खायला आवडते. तेथील लग्नसोहळेही भारतातील सोहळ्यांप्रमाणे भव्य असतात. तिथे मला एक व्यक्ती भेटली. तो म्हणाला, 'आमच्या देशात कोणीच कुणाला त्याचा धर्म व जात विचारत नाही. तर अनोळखी व्यक्तीला तुम्ही जेवण केले का, एवढेच ते विचारतात.'

बातम्या आणखी आहेत...