आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिखलीकर केवळ सदिच्छा भेटीसाठी आले होते अजित पवार

मुंबई - राज्यातील 30 वर्षांची युती तोडून शिवसेनें नवीन संसार थाटलाय. त्यानंतर आज आज शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला विधानसभेत बहूमत सिद्ध करायचे आहे. यातच राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
 


आज बहुमताची चाचणी होणार असताना भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. या भेटीबद्दल अजित पवार म्हणाले, 'ही केवळ एक सदिच्छा भेट होती. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी एकमेकांचे दुश्मन नाही. मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि ते भाजपचेच आहेत. संजय राऊतांनी सांगितलेला बहुमताचा आकडा निश्चितच सिद्ध होईल. राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी घेईन. नेते जे सांगतील ते मी करणार.' असेही यावेळी ते म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...