Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | meeting on 18 September for meyor election

महापाैर निवडीसाठी १८ सप्टेंबर राेजी सभा; पीठासीन अधिकारीपदी जिल्हाधिकारी राहणार

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 09:16 AM IST

महापालिकेच्या १३वा महापाैर निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात अाला अाहे. १८ सप्टेंबर राेजी सकाळी ११ वाजता पालिकेत विशेष म

  • meeting on 18 September for meyor election

    जळगाव- महापालिकेच्या १३वा महापाैर निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात अाला अाहे. १८ सप्टेंबर राेजी सकाळी ११ वाजता पालिकेत विशेष महासभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान अर्ज स्वीकारणे व दाखल करण्याची प्रक्रीया पार पडणार अाहे. कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अाता राजकीय हालचालींना खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचे चित्र अाहे.


    महापालिकेची चाैथी सार्वत्रिक निवडणूक १ अाॅगस्ट राेजी झाली. त्यात ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळाल्याने भाजपचा महापाैर हाेणार हे निश्चित अाहे. दरम्यान सन २०१३मध्ये निवडून अालेल्या नगरसेवकांची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून नवनिर्वाचित सदस्यांचे पालिकेतील अागमन हाेऊ शकले नव्हते. दरम्यान, विभागीय अायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून १८ सप्टेंबर राेजी सकाळी महापाैर निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे.

Trending