आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • #MeeToo: Alia Bhatt Mother Sony Razdan Share Her Harassment Story While Shooting Set

#MeToo: आलिया भट्टच्या आईने सांगितली आपबीती, 'शूटिंगदरम्यान माझ्यावर रेपचा प्रयत्न झाला होता'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - #MeeToo कॅम्पेनमध्ये आलिया भट्टची आई अन् अॅक्ट्रेस सोनी राजदान यांनीही आपल्यासोबत झालेल्या सेक्शुअल हरॅसमेंटची घटना झाल्याचे सांगितले आहे. तथापि, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या कुणाचेही त्यांनी नाव घेतले नाही. सोनी म्हणाल्या की, एक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकाने त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. सोनी यांनी हा खुलासा एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. सोनी म्हणाल्या की, मी भाग्यशाली आहे की, मला काम मागण्यासाठी सेक्शुअल हरॅसमेंटचा सामना करावा नाही लागला. तथापि, काम करताना त्या सेक्शुअल हरॅसमेंटची शिकार ठरल्या.

 

सोनी यांनी कधीच नाही केली तक्रार
- सेक्शुअल हरॅसमेंटच्या या घटनेची सोनीने कधी तक्रार केली नाही. यावर त्या म्हणाल्या की, "मी गप्प राहिले कारण मी त्याच्या कुटुंबाला ओळखत होते. आणि त्याचे कुटुंबीय अडचणीत यावेत असे मला वाटत नव्हते. त्याला दोन लहान मुलेही होती." 
- सोनी असेही म्हणाल्या की, मी असे वागले, जसे काही घडलेच नाही. मी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मी गप्प राहण्याचे कारण लाज नव्हते. कारण जर आज असे झाले असते, तर मी एवढी उदारता दाखवली नसती. याची तक्रार केली असती.

 

आलोक नाथवर बोलल्या सोनी
- सोनी यांनी अॅक्टर आलोक नाथवरही मत मांडले. सोनी म्हणाल्या, "आलोक नाथबद्दल सर्वांना माहिती आहे. तो दारू प्यायल्यानंतर वेगळाच बनतो. त्यांनी माझ्यासोबत कधीही काही केले नाही, परंतु त्यांचे डोळे बरेच काही बोलून जातात.
- "जेव्हा मी विनता नंदाची पोस्ट वाचली तेव्हा धक्काच बसला. आलोकने आपल्यावरील आरोप स्वीकारत विनताकडून माफी मागितली पाहिजे."

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...