आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघालय : 370 फूट खोल कोळसा खाणीत 15 मजूर अडकले; हवाई दल, नौदल पाणबुड्यांची प्रयत्नांची शर्थ; वाचणे कठीण :बचाव पथक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिलाँग मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यात अवैध कोळसा खाणीत फसलेल्या १५ मजुरांचा १५ दिवसांनंतरही काही थांगपत्ता लागला नाही. ३७० फूट खाेल खाणीत ७० फुटांपर्यंत पाणी भरले हाेते. हे पाणी काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीमच्या मागणीनंतर हवाई दलाचे एक विमान शुक्रवारी २१ जवानांसह १०० अश्वशक्तीचे १० माेटरपंप घेऊन रवाना झाले. तसेच विशाखापट्टणम येथून नौदलाच्या पाणबुड्या देखील आेडिशात दाखल झाल्या आहेत.

 

ओडिशातील अग्निशमन दलाचे २० सदस्य या मोहिमेत सहभागी हाेणार असल्याचे सांगण्यात आले.या दाेन्ही टीमसह एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक दलही बचाव व मदतकार्यात सहभागी होऊन युद्धपातळीवर कामास लागले आहेत. खासगी कंपनी किर्लोस्करची टीम उच्च क्षमतेचा पंप घेऊन पाेहोचली अाहे. या कंपनीने इंडोनेशियातील गुहेत फसलेल्या फुटबॉल टीमच्या बचावकार्याच्या वेळी माेटरपंप पाठवले हाेते. त्याची मदत या मोहिमेतही होईल, असा प्रयत्न आहे. यापूर्वी एनडीआरएफने म्हटले की, 'खाणीतील पाण्याची पातळी माेजण्यासाठी पाणबुड्यांना क्रेनने उतरवले . परंतु १५ मिनिटांत शिटी वाजवताच त्यांना वरती खेचण्यात आले. त्यांनी खाणीतून वास येत असल्याची सूचना केली. यामुळे हे मजूर जिवंत असण्याची शक्यता धूसर झाली आहे. परंतु काहीतरी चमत्कार होऊन सर्व मजूरांना सुखरूप बाहेर काढता येईल, या अपेक्षेने प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहेत.

 

बचावकार्यास उशीर झाला, कारण...
मदत मागण्यास उशीर :
-एनडीआरएफजवळ उच्च क्षमतेचे माेटरपंप नव्हते. घटनेच्या दाेन अाठवड्यांनंतर हवाई दलाकडून मदत मागितली गेली. यासाठी किर्लोस्करचे तेच माेटरपंप हवे हाेते जे थायलंडमधील गुहेत फसलेल्या मुलांना वाचवण्यासाठी वापरले हाेते.
-एनडीआरएफच्या पाणबुड्या फक्त ४० फूट खाेलपर्यंत जाऊ शकतात.

-जिल्हाधिकाऱ्यांनी माेटरपंप मागण्यासाठी मेघालय सरकारला अाठवड्यानंतर पत्र लिहिले. -दुसरा अाठवडा कोल इंडियाकडून मदत मागण्यासाठी गेला.
-रॅट होल माइन म्हणजे मजुरांसाठी मृत्यूच

 

सरकारकडून उशीर व राजकारण :
-देशात व जगात वृत्त पाेहोचल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. १४ दिवसांनी मुख्यमंत्री संगमा यांचे दाेन मंत्री घटनास्थळी पाेहोचले.

-मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावर विराेधी पक्षाने सरकार या घटनेनंतर गंभीर नसल्याचा अाराेप लावला. मदतकार्यास उशीर झाला.
-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे टि्वट - पीएम फोटो काढण्यात मग्न, खदानीत मजुरांची मृत्यूशी झुंज.

-उभ्या गुहेला रॅट होल माइन म्हटले जाते. त्यात फक्त एक व्यक्ती जाऊ शकेल, इतकी जागा असते. २०१४ मध्ये एनजीटीने या खदानींवर बंदी अाणली हाेती. त्यानंतरही अवैध खनन सुरू अाहे.

बातम्या आणखी आहेत...