आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावी बायोडेटा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेघना धर्मेश

नोकरी शोधमोहिमेत पहिली पायरी असते आपला बायोडेटा. प्रभावी बायोडेटा आपल्यासाठी नक्कीच मुलाखतीचे दरवाजे उघडू शकतो. कॉर्पोरेट मंत्रामध्ये बायोडेटाबद्दल जरा सविस्तरपणे जाणून  घेऊया.


जेव्हा आपण बायोडेटा सॉफ्ट कॉपी म्हणजे संगणकावर बनवणार असू तेव्हा आपलं स्वतःचं नाव फाइल नाव म्हणून द्या आणि कोणत्या महिन्यात, वर्षी तुम्ही सुधारित(updated)केलाय ते कंसात लिहा. उदा: Nisha_Roy (Sep_2019).तुम्ही वर्ड /PDF  कोणतही  स्वरूप (Format) वापरू शकता. बायोडेटा  हार्ड कॉपीसाठी तुम्ही चांगल्या प्रतीच्या कागदावर प्रिंट घेऊ शकता. 


खूप जण शीर्षक म्हणून मोठ्या  अक्षरात  रेझ्युमे  /CV / बायोडेटा  लिहतात. त्याची खरंच गरज नसते. सुरुवात आपण आपलं नाव, पूर्ण पत्ता, ई-मेल आयडी. शक्यतो स्वतःचा मोबाइल नंबर, जो चालू आहे अशी करावी. बऱ्याचदा कंपनीची HR टीम जेव्हा मुलाखतीसाठी कॉल करते तेव्हा हा नंबर अस्तित्वात नाही असा संदेश येतो.  मोबाइल फोन हे सर्वात जलद संवादाचे माध्यम असल्यामुळे आपण त्याचं महत्त्व  जाणलं पाहिजे. आपला ई-मेल आयडीसुध्दा व्यावसायिक असावा. शक्यतो आपलं नाव आणि आडनाव येईल असं. उदा: nisha_roy@gmail.com

आपला उद्देश (objective) हा  १-२ ओळीत थोडक्यात  सांगणे महत्त्वाचे. उद्देश हे तुमचं करिअर ध्येय (career goals)सांगते. यात तुम्ही कोणत्या प्रकारचं काम बघताय, हुद्दा(JobPosition/Title) आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची कौशल्ये याबद्दल माहिती देणं अपेक्षित आहे.

शैक्षणिक पात्रता (educational qualification)यात टेबल स्वरूपात कोणती परीक्षा, कोणते विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष आणि मिळालेले गुण व्यवस्थितपणे देणे जरुरी आहे. इतर पात्रतामध्ये संगणक ज्ञान आणि काही केलेले अभ्यासक्रम याबद्दल लिहू शकता. इतर माहितीमध्ये जेंडर (male/female),आपली जन्मतारीख, वैवाहिक स्थिती (विवाहित /अविवाहित) याबद्दल लिहावं. 

धर्म (Religion), राष्ट्रीयत्व (Nationality) आणि जात (Caste) याबद्दल बायोडेटावर लिहावं की नाही हे प्रत्येकाच्या स्वतःच्या इच्छेवर आहे. आपले छंद /आवड हेसुध्दा ऐच्छिक आहे. आपल्याला येणाऱ्या भाषा मात्र नमूद कराव्यात.

अनुभव (Experience) सुद्धा आताच्या कामापासून सुरुवात करून मग शेवटी पहिली नोकरी अशा स्वरूपात द्यावा. त्यात आपला हुद्दा, कामाचं स्वरूप, जबाबदाऱ्या याबद्दल माहिती देणं महत्त्वाचं. संदर्भ (Reference) तुम्ही प्रत्यक्ष मुलाखती वेळेस देऊ शकता. 

फोटो हा सुरुवातीलाच attach करावा. जो पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचा असावा. तुमचे पिकनिकचे फोटो पाहण्यात नोकरी देणाऱ्याला बिल्कुल रस नसतो. आपल्याला मुलाखतीला बोलवण्याआधीच येणारे अडथळे कसे टाळावे याचा बायोडेटा बनवताना नक्कीच विचार करायाला हवा. रंगीबेरंगी fonts, highlight, वेगळेवेगळे चिन्ह याचा वापर टाळण उत्तम. पूर्ण बायोडेटा बुलेट्सच्या स्वरूपात वाचणं त्रासदायक ठरू शकतं, म्हणून शक्य तिथेच बुलेट्स वापराव्यात. आपली पूर्ण आणि खरी माहिती  देणं जरुरी आहे.

बायोडेटा  आपण English मध्ये बनवत असल्यामुळे सर्वात शेवटी Spelling चेक करायला विसरू नका .१ /२ पानांचा  बायोडेटा  तुम्ही तुमच्या आवडीने डिझाइन करू शकता. Simple, Short, Smart बायोडेटा जो एक ठसा उमटवेल तो बनवणं आता नक्कीच तुमच्या हातात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...