आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: वडिलांवर चित्रपट बनवणार नाही आणि बनवूही देणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज दिग्दर्शक, लेखक, कवी आणि संगीतकार गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार हिचे एक पुस्तक 2004 मध्ये प्रकाशित झाले होते. 'बिकॉज ही इज' नावाच्या या पुस्तकात मेघनाने वडिलांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाविषयी उल्लेख केला होता. आता पुन्हा ती या पुस्तकात आणखी काही माहिती टाकून पुन्हा री-पब्लिश करत आहे. मात्र मेघना या पुस्तकाला गुलजारची बायोग्राफी मानत नाही. ती म्हणते.., ' 14 वर्षांपूर्वीदेखील लोकांना हे पुस्तक आवडले होते आणि नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे. 
 

री-पब्लिश्ड व्हर्जनविषयी काही सांग ? 
वडील परवानगी देतील तरंच मी ते प्रकाशित करणार आहे. यात त्यांनी 2004 मध्ये लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे. 

 

मेघना गुलजार म्हणाली.. 
2004 मध्ये तुमचे पहिले पुस्तक प्रकाशित झाल्यांनतर वडिलांच्या जीवनात काय बदल झाला ? 
या 14 वर्षांत खूप काही बदल झाला आहे. वडिलांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यात खूप नवीन गोष्टी झाल्या. तेव्हा ते आजाेबा नव्हते आणि आज आजोबा झाले आहेत. व्यावसायिक विषयी बोलायचे झाले तर आज ते फुलटाइम लेखक झाले आहेत. त्यामुळे पुस्तक रीलाँच करावे असे मला वाटले. 

 

 गुलजार साहेबांच्या विषयी खूप काही लिहिले गेले आहे. मुलगी म्हणून तुम्ही काय नवीन जोडले ? 
या पुस्तकात त्यांचा वडील म्हणून उल्लेख नाही तर माझ्या दृष्टिकोणातून ते कसे आहेत, हे सांगण्यात आले आहे. इतरांपेक्षा मी चांगले लिहिले असे मी म्हणणार नाही. मात्र इतरांपेक्षा मला त्यांच्याविषयी जास्त माहिती आहे, असे मी म्हणेन. 

 

 वडिलांच्या व्यावसायिक जीवनाचा तुझ्या जीवनावर कसा प्रभाव पडला ? 
व्यावसायिक जीवनापेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त परिणाम झाला आहे. आम्ही एकाच प्रोफेशनमध्ये आहोत. मात्र आमच्यात सारखेपणा आहे. मला त्यांच्या कामाचा साधेपणा आवडतो. माझ्या कामातही मी तोच आणण्याचा प्रयत्न करते. ते फारचं कमी शब्दांत आपले म्हणणे मांडतात. 

 

 कोणत्या गोष्टीवर तुमचे विचार जुळत नाहीत ? 
मी भावनावर मनमोकळे बोलत असते. माझा पहिला चित्रपट फिलहाल सरोगसीवर आधारित होता. चित्रपटात अनेक धाडसी संवाद होते. मी जे धडक बोलते. मात्र त्यांची इच्छा होती की मी रुपांतरित करून बोलावे. येथे आमचे व्यक्तिमत्त्व मेळ खात नाही. मी कठोर आहे, असे मला वाटते आणि ते एकदम सौम्य. 

 

 वडिलांच्या जीवनावर चित्रपट बनवशील का ? 
नाही, पुस्तकात शब्दाची मर्यादा नसते आणि पानांचीही नसते. येथे तुम्ही त्यांच्या कथेसोबत न्याय करू शकता. मात्र चित्रपटात तुम्ही असे करू शकत नाही. त्यांच्या आयुष्य अडीच तासात सांगणे अवघड आहे. वडिलांच्या जीवनात अनेक अशा घटना आहेत त्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. फाळणीनंतर भारतात येणे आणि चित्रपटात सहायक म्हणून काम करणे. नंतर संगीतकार, संवाद लेखक, कथा लेखक, निर्माते, आता कवी होणे. हा खूपच लांब प्रवास हाेता. तुम्ही हा एका चॅप्टरमध्ये संपवू शकत नाही. मी कधीच वडिलांवर चित्रपट बनवणार नाही आणि कुणाला बनवूदेखील देणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...