बुलडाणा / भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये गर्भवती महिलेसह 6 वर्षीय मुलाचा समावेश

मुसळधार पावसामुळे कोसळली भिंत; गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली घटना 

दिव्य मराठी

Sep 20,2019 12:47:15 PM IST

संतोष मलोसे

बुलडाणा - बुलडाण्यातील मेहकर येथील शेख कुटुंबावर घराची भिंत कोसळून कुटुंबातील 3 जण ठार तर 2 जखमी झाले. मृतांमध्ये गर्भवती महिलेसह 6 वर्षीय मुलाचा समावेश आहे. गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे मेहेकर येथील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंबावर गाढ़ झोपेत असताना रात्री 2 वाजेदरम्यान घराशेजारील जूनी मातीची भिंत कोसळली. यात कुटुंबातील पाच जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. यानंतर पोलिस व परिसरातील नागरिक घटनास्थळावर धावून आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पाच पैकी तिघांना मृत घोषित केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत शेख असिफ शेख अशरफ (वय 28 वर्षे), शाहिस्ता बी शेख असिफ (वय 25 वर्षे) व जुनेद शेख असिफ (वय 6 वर्षे) यांचा मृत्यू झाला.

X
COMMENT