आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महबूबा म्हणाल्या- 'टीम इंडियाचा भगव्या जर्सीमुळे पराभव', संजय राउत म्हणाले- 'हिला पागलखान्यात पाठवा...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- विश्वचषकात शनिवारी इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात भारताला पहिल्यांदाचा पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर माजी क्रिकेटरपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या महबूबा मुफ्तींनी भारताचा पराभव भगव्या जर्सीमुळे झाला, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राउत म्हणाले- "मुफ्तीला पागलखान्यात पाठवायला पाहीजे."

 

राउत पुढे म्हणाले- "जर भगव्या रंगामुळे पराभव झाला, तर मग पाकिस्तान हिरव्या रंगासोबत कसकाय हरला?" महबूबा यांनी रविवारी ट्वीट केले, "तुम्ही मला अंधश्रद्धाळू माना, पण माझे हेच म्हणने आहे की, भारताचा विजयरथ त्याच्या भगव्या जर्सीमुळे थांबला."


खरतर, जर्सीचे पहिले फोटो समोर आल्यानंतर राजकारणात वाद सुरू झाला. काही नेत्यांनी भगव्या रंगाला जर्सीमध्ये जास्त स्थान दिल्यामुळे आरोप केले. नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही भारताच्या कामगिरी निराशनजनक असल्याचे म्हटले.


महबूबा यांनी सामन्यादरम्यान एक ट्वीट केले होते. त्या म्हणाल्या, "पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स इंग्लंडविरूद्ध भारत सामना जिंकण्याची आपेक्ष करत होते. चला, कमीत कमी क्रिकेटमुळे दोन्ही देश एकत्र आले.”


उमर यांनी ट्वीट पोस्ट करून भारताचे समर्थन केले  
उमर अब्दुल्ला यांनी भारताच्या पराभवावर संशय व्यक्त करत म्हटले की, जर इंग्लंड आणि पाकिस्तानऐवजी भारतासाठी हा अटितटीचा सामना असता तर, काय भारताचे प्रदर्शन असे असते...? त्याआधी त्यांनी एक पाकिस्तानी महिला भारताचे समर्थन करत असल्याचे ट्वीटही केले होते. वरीधा हुसैन नावाच्या महिलेने "हर हर मोदी, घर घर मोदी...जय श्रीराम" असे कॅप्शन असलेले ट्वीट केले होते.