आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PNB Fraud: मेहुल चौकसी फरार आहे, त्याच्या याचिका रद्द करा; मुंबई हायकोर्टात ईडीचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चौकसी एक फरार आरोपी आहे. त्याच्या दोन्ही याचिका रद्द करण्यात याव्या असे आवाहन अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने मुंबई हायकोर्टात मंगळवारी केले. चौकसीने स्वथःला फरार आणि आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. त्यानुसार, ईडीने आपल्याला काही लोकांच्या साक्षीवरून फरार आणि आर्थिक गुन्हेगार घोषित केले. त्या साक्षीदारांसोबत समोरा-समोर चर्चेची परवानगी द्यावी अशी विनंती चौकसीने केली होती. या दोन्ही याचिकांवर 10 जून रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे.


ईडीने आपल्या विनंती अर्जात लिहिल्यानुसार, चौकसी पीएनबी घोटाळ्यातील 6,097 कोटी रुपयांचा फेर-फार करण्याचा आरोपी आहे. त्याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. चौकसीने अॅण्टीगुआचे नागरिक्तव घेतले आहे. यातून स्पष्ट होते, की तो चौकशीत सहकार्य करण्यासाठी भारतात येऊ इच्छित नाही. आर्थिक गुन्हेगारी कायद्यानुसार, या प्रकरणात फरार असलेला आरोपी कोर्टात हजेरी लावत असेल तर त्याच्याविरुद्ध निलंबित कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. पण, सूचना देऊनही कोर्टात हजर होत नसल्यास त्यांना फरार घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त केली जाते.


मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारीच सीबीआयला नोटीस जारी केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. चौकसीने वकिलांच्या मार्फत आपल्या याचिका दाखल केल्या. त्यामध्ये चौकसी म्हणाला, की पीएनबी घोटाळ्याची चौकशी कथितरित्या अपुरी आहे. ती पूर्ण व्हायलाच हवी. चौकशी अधिकारी सुद्धा कोर्टासमोर अर्धवट आरोपपत्र दाखल करत आहेत. चौकसीच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, सीबीआयने चौकसीच्या औद्योगिक तोट्याला सुद्धा घोटाळा दाखवले आहे. एवढेच नव्हे, तर 2 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी 2018 रोजी सीबीआयने चौकसी विरोधात खोट्या एफआयआर दाखल केल्या असाही दावा करण्यात आला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...