आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Meijan Jaffrey To Play Lead Role In Hungama 2, 'Lootcase' To Be Released On April 10 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'हंगामा 2'मध्ये लीड रोल साकारणार मीजान जाफरी, 10 एप्रिलला रिलीज होईल 'लूटकेस'    

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता जावेद जाफरींचा मुलगा मीजान दिग्दर्शन प्रियदर्शन यांच्या आगामी 'हंगामा 2' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मीजान लीड रोल साकारणार आहे. याशिवाय तो कुणाल खेमूच्या आगामी  'लूटकेस' या चित्रपटातही झळकणार असून हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. मंगळवारी या दोन्ही चित्रपटांविषयीची ही माहिती समोर आली आहे. मीजानने 'मलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 

🥶

A post shared by Meezaan (@meezaanj) on

16 वर्षांपूर्वी आला होता 'हंगामा' 
'हंगामा 2' हा चित्रपट 2003 मध्ये आलेल्या 'हंगामा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपटही प्रियदर्शनच दिग्दर्शित करत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सिक्वेलमध्ये मीजान जाफरी मुख्य भूमिका साकारत असल्याची अधिकृत घोषणा केली होती. 'हंगामा'च्या पहिल्या भागात अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी, रिमी सेन, शोमा आनंद आणि परेश रावल यांनी काम केले होते. हा चित्रपट प्रियदर्शन यांच्याच 'पूचक्कोरू मूक्कुथी' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट 1984 साली रिलीज झाला होता.