आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलबर्न: भारतीय संघाला आणि चाहत्यांना वर्णद्वेषी म्हणुन हिणवले; ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना हाकलले बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- आपल्या संघाची झालेली तऱ्हा पाहता मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मग भारतीय संघाला आपल्या शेरेबाजीने लक्ष्य करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी स्टँडमध्ये बसून भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल काही अपशब्दही वापरले.

मेलबर्न- एमसीजी स्टेडियममध्ये सुरू असणाऱ्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यावेळी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून भारतीय संघाला अपशब्दांनी प्रतिक्रिया करण्यास सुरुवात केली होती. मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी भारतीय संघाविरुद्ध 'शो अस योर वीजा'ची घोषणाबाजी केली. ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून स्टँडमध्ये बसून भारतीय संघाला काही अपशब्दही वापरण्यात आले. त्यानंतर ताततडीने या प्रकरणी भारतीय संघाने याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सर्व ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना बाहेर हाकलवून दिले.

 

प्रेक्षकांच्या वर्तनाचे केले जात आहे परिक्षण
सुत्रांनुसार, स्टेडियममध्ये साउथर्न स्टँडमध्ये सर्वात खाली बसलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर खेळाडूंनी पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच त्यांनी दखल घेण्यात आली.

 

तीसऱ्या दिवशीही अनेक प्रेक्षकांना काढले बाहेर
कसोटी सामने सुरू असताना स्टेडियममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून अनेकदा भारतीय खेळाडूंविरुद्ध 'शो अस योर वीजा' अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तीसऱ्या दिवशीही हा प्रकार सुरू असताना भारतीय क्रिकेटपटूंनी तक्रार करताच सबंधित प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर हाकलण्यात आले.
 

बातम्या आणखी आहेत...