gadget / सोशल मीडियावर मीम्सद्वारे ह्यूमर शेअर करणे आवडते तर मग गमतीशीर मीम्ससाठी या टूल्सचा उपयोग करा

तुम्ही स्वत: ते तयार करून साेशल मीडियावर शेअर करून लोकांना आपले फॅन बनवू शकता

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 19,2019 10:08:00 AM IST

जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर तुम्हाला एक इंटरनेट मीमचा अर्थ काय असतो, याची कल्पना असेल. तरीही तुमच्या माहितीस्तव सांगतो की, मीम्सचा उपयोग एखादी कल्पना, वागणे अथवा स्टाइल दाखविण्यासाठी केला जातो. साधारणत: ते हलकेफुलके व्यंगचित्र म्हणून तयार केले जातात. वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअरही केले जातात. त्यांना अनेक फॉर्म्समध्ये तयार केले जातात. यात बहुतांश फोटोज अथवा इलस्ट्रेशन्स असतात. त्यावर लिहिलेला मजकूर मोठ्या टायपात अथवा कॅपिटल लेटर्समध्ये असताे. जर तुम्हाला मीम्स आकर्षित करत असतील तर तुम्ही स्वत: ते तयार करून साेशल मीडियावर शेअर करून लोकांना आपले फॅन बनवू शकता. मात्र, यासाठी काही टिप्स व टूल्स उपयोगी पडू शकतात.

> MemeGenerator :

या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही अन्य युजर्सचे मीम्स ब्राऊज करू शकता. त्याचबरोबर मेन्यूमध्ये जाऊन वेगळे कॅरेक्टर्स, इमेजेस्, पॉप्युलर व नवे ट्रेंड्स शोधू शकता. एक मीम तयार करण्यासाठी तुम्हाला क्रिएट ऑप्शनवर कर्सर नेऊन त्यावर काही वेळ ठेवावा. युजर अकाऊंट तयार न करताही या टूलचा वापर करून तुम्ही टेक्स्ट साइज, लोकेशन अथवा कलर कस्टमाइज करू शकणार नाही.


>Imgur :

या टूलवर जाऊन एक डिफॉल्ट इमेज बँकग्राऊंड सिलेक्ट करा. फोटोची निवड करण्यासाठी तुम्ही यात असलेल्या फोटोचा वापर करू शकता. अथवा तुमच्याकडील फोटो अपलोड करू शकता. आता कॅप्शन ठरविण्यासाठी मजकुर संपादित करावा. तो तयार केल्यानंतर शेअर करावा. हे टूल इनबिल्ट मीम्स उपलब्ध करून देतो. त्यांना तुम्ही संपादित करू शकता.


> DIYLOL :

दोन टेक्स्ट बॉक्सेस सारखे फीचर्स सोबत हे टूल तुम्हाला टेक्स्ट कलर, साइज इत्यादी कस्टमाइज करण्याची सुविधा देते. युजर अकाऊंट शिवाय या टूलवर काही नेमप्लेट्स उपलब्ध असतील. त्याचबरोबर यावर तयार केलेले मीम्स तुम्ही डाऊनलोड करू शकता. परंतु कोणत्याही वेबसाइटवर शेअर करू शकत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

X
COMMENT