आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्मरणीय : या शिक्षकांना पाहिले नाही, पण त्यांच्याशिवाय अभ्यासही नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिन विशेष - असे म्हटले जाते की, पुस्तके हेच खरे गुरू असतात. यासाठी आपल्याला शिक्षित करण्यात शिक्षकांचा जितका हात असतो, तितकाच पुस्तकांचाही असतो. या काही शिक्षकांना आपण पाहिलेही नाही, परंतु त्यांची पुस्तके वाचून अनेक पिढ्या घडल्या आहेत. या शिक्षकांची पुस्तके शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी कोठे ना कोठे वाचलीच आहेत.

डीडी बसू : ७० वर्षांपासून भारतीय घटनेवरील सर्वात सोपे पुस्तक
यांचे ‘कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया’ हे पुस्तक १९५० मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाले होते. भारतीय घटना समजून घेण्यासाठी सर्वात सोपे पुस्तक आहे. १९९७ मध्ये प्रतिष्ठित न्यायाधीशांनी नव्या संदर्भासह ते तयार केले आहे. 

दत्त-सुंदरम : इंडियन इकॉनॉमीच्या १०० हून अधिक आवृत्त्या निघाल्या
प्रा. कै. रुदार दत्त व केपीएम सुंदरम यांच्या ‘इंडियन इकॉनॉमी’ या इंग्रजी आवृत्तीच्या ६० व हिंदीच्या ४५ हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. प्रा. रुदार दिल्लीतून १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. 

रेन अँड मार्टिन : १९३५पासून भारत व पाकमध्ये शिकवले जाते ग्रामर
यांनी लिहिलेले हायस्कूल इंग्रजी ग्रामर अँड कम्पोझिशन भारतात १९३५ पासून शिकवले जाते. ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी तयार केले होते. भारत, पाक, म्यानमारमध्ये आजही शिकवले जाते. 

आरडी शर्मा : ६ वी ते अभियांत्रिकीपर्यंत विद्यार्थी शिकतात यांचे गणित
के. सी. शर्मा यांच्या नोट्सच्या आधारे १९८६ मध्ये प्रथमच लिनियर अल्जेब्राचे पुस्तक राजस्थान विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी तयार केले होते. ६ वीपासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी  यांचे गणिताचे पुस्तक आहे. 

एचसी वर्मा : यांच्या ३०० प्रयोगांतून मुले समजतात फिजिक्स
आयआयटी कानपूरचेे  प्राध्यापक असलेल्या वर्मांचे ‘कन्सेप्ट ऑफ फिजिक्स’ सर्वात जास्त वाचले जाते. प्रथम १९९२ मध्ये हे पुस्तक आले. त्यांनी तयार केलेले ३०० प्रयोग ७ वी ते १२ वीचे विद्यार्थी करतात.