आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवण: मुंडेंच्या गुरुप्रेमाची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना साधारणत: 1998-99 ची असेल. मी, माझे मिस्टर श्रेयस शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विभागाच्या मान्यतेसाठी गोपीनाथ मुंडे यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांची मोठी रांगच लागलेली होती. त्यामुळे आम्हीदेखील रांगेत उभे राहिलो. बराच वेळ वाट पाहत होतो. मात्र भेट काही होत नव्हती.

गोपीनाथराव माझे मिस्टर प्रा. शरदचंद्र रत्नाळीकर यांचे विद्यार्थी होते. अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. मात्र, मिस्टरांनी रांगेत उभे राहूनच त्यांची भेट घेण्याचे ठरवले होते. शेवटी न राहून मीच एका कागदावर त्यांचे नाव लिहून ती चिठ्ठी आत पाठवली. तशी तिथे असलेली गर्दी पाहून याचा किती उपयोग होईल याबाबत मनात साशंकता होतीच. मात्र, थोड्याच वेळात आतून एक व्यक्ती बाहेर आला आणि गर्दीतून मार्ग काढत आम्हाला आत घेऊन गेला. आम्ही रांग तोडत आत जात आहोत हे पाहिल्यामुळे इतर मंडळींनी चांगलाच आरडाओरडा केला. मात्र, त्यानेच हे मुंडे साहेबांचे गुरू आहेत, असे सांगत सर्वांना शांत केले.
आत गेल्यावर गोपीनाथरावांनी आम्हा दोघांनाही नमस्कार केला. कामाबाबत चौकशी केली. तसेच सर्व कागदपत्रे नियमानुसार आहेत का? याचीदेखील चौकशी केली. आपले गुरू शिक्षण क्षेत्राविषयी मदत मागत आहेत आणि आपण ते पूर्ण करत आहोत याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. त्यांच्या मनात आपल्या गुरुविषयी असलेला आदर आणि शिक्षणाविषयी असलेली तळमळ माझ्यासह आसपासच्या सर्वांच्या सहजच लक्षात येण्याजोगी होती. त्यांच्या अंगी असलेली विनम्रता पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी कौतुकाची आणि आदराची भावना अधिकच बळावली. विद्यार्थिदशेतील गुरूची आठवण ठेवून त्यांना आदराची वागणूक देणारे असे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थानच आहे.
- प्रभा शरदचंद्र रत्नाळीकर, श्रेयस शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद.