मेमोरी कार्डचा व्यवसाय / मेमोरी कार्डचा व्यवसाय जोरात!

May 24,2011 08:48:10 PM IST

मेमोरी कार्डचा व्यवसाय जोरात!

गेल्या वर्षीच्या तुलनेत मेमोरी कार्डची विक्री दुप्पटीने वाढली आहे. मोबाईल फोनच्या किंमतीत प्रचंड घट झाली आहे. त्यात मल्टीमिडिया मोबाईल फोनची संख्या जास्त आहे. फोनमध्ये अनेक फीचर्स असतात. त्यासाठी जास्त मेमोरी लागते. मोबाईल फोनच्या मेमोरी क्षमतेमधेही वाढ झाली आहे. सुमारे ८ जीबिपासून ३२ जीबीपर्यंत क्षमता असलेले मोबाईल फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच मेमोरी कार्डची मागणी वाढली आहे.

बाजारात किंग्स्टन, इत्यादी ब्रांडचे मेमोरी कार्ड उपलब्ध आहेत. यावर कंपनी ३ ते ५ वर्षापर्यंत वारंटी देते. पण, बनावट मेमोरी कार्डचा धंदाही जोरात आहे. अशा कार्डवर खोटी वारंटी देतात. शिवाय त्यात पूर्ण मेमोरी क्षमता नसते आणि हे कार्ड लवकर खराब होतात. अगदी १०० रुपयात २ जीबी आणि १५० रुपयात ४ जीबी क्षमतेचे कार्ड मिळतात. पण, असे बनावट कार्ड लवकर खराब होतात आणि अनेकवेळा महत्वाची माहिती नष्ट होते. त्यामुळे अशा कार्डपासून दूरच राहावे. मेमोरी कार्डच्या व्यवसायात जास्त मार्जिन नसते. पण, विक्री मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे चांगला नफा मिळतो.

X