लव्ह मॅरेज असो / लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज- या 8 गोष्टी पुरुष आपल्या पत्नीला नेहमीच बोलतात खोटे!

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2018 12:02:00 AM IST

स्त्री-पुरुष ही सुखी संसाराची चाके असल्याचे म्हटले जाते. एखादा अप्रमाणिक निघाला तर त्या वेदना आयुष्यभरासाठी जीवघेण्या ठरतात. यामुळे जर तुमचेही लग्न होणार असेल आणि ते लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असेल तर होणाऱ्या पतीची पूर्ण पडताळणी करून घेणे कधीही उत्तम राहील. सर्वसाधारणपणे लग्नाआधी बहुतांश मुले, मुलीला इम्प्रेस करण्यासाठी बरेच खोटे बोलतात.

- हो! हे सर्व विचार विवाहेच्छुक महिलेच्या मनात येतात. प्रत्येक स्त्रीला तिचा भावी पती हा प्रामाणिक, सुस्वभावी असावा ही अपेक्षा असते, पण बऱ्याचदा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि अपेक्षाभंगाचे दु:ख त्यांना आयुष्यभर डाचत राहते.
तसे तर अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबीय स्वत:च पूर्ण पडताळणी करून मग लग्न पक्के करतात. लव्ह मॅरेजमध्ये तरुणी स्वत:च सर्व माहिती घेतात, पण तरीही मुले काही गोष्टी उघड करत नाहीत, ते लपवतात.

- या गोष्टी लपवण्यामागे त्यांना धोका द्यायचा नसतो. असे म्हणण्यामागे मुलांचा उद्देश फक्त एवढाच असतो की, त्यांचे होणारी बायको आणि तिच्या घरच्यांवर चांगले इम्प्रेशन बनावे. सामान्यपणे तरुण लग्नाआधी पुढील असत्य- खोटे बोलतात.

खोटे नं. 1
- आजपर्यंत मी कोणत्याही मुलीला वाईट नजरेने पाहिलेले नाही.

खोटे नं. 2
मला घेण्या-देण्यात विश्वास नाही, तू फक्त नेसत्या वस्त्रानिशी लग्न करून घरी ये.

खोटे नं. 3
तुझे भाऊ-बहीण मला माझ्या भावंडांसारखे आहेत. त्यांच्याबद्दल माझेही काही कर्तव्य आहे.

खोटे नं. 4
तू मला प्रत्येक बाबतीत सुंदर वाटतेस.

खोटे नं. 5
मला तुझी साथ जेवढी आवडते तेवढी जगात इतर कुणाचीच आवडत नाही.

खोटे नं. 6
- मला तुझ्या घरचे फार आवडतात.

खोटे नं. 7
तू बॉलीवूडच्या कोणत्याही नटीला मात देशील.

खोटे नं. 8
लग्नानंतर घर सांभाळणे तुझी एकटीची जबाबदारी नाही. मीही तुला मदत करेन.

X
COMMENT