आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या या व्हिलनने चित्रपटांमध्ये दिले 250 रेप सीन, लोक बघताच क्षणी लपवायचे आपल्या पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - प्रेम चोप्रा यांची गणना बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये होते. या अभिनेत्याचा अभिनय बघून सामान्य लोक खासगी आयुष्यातही त्याला खलनायकच समजत होते. उद्या (23 सप्टेंबर) वयाची 83 वर्षे पूर्ण करत असलेल्या प्रेम चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "मला बघून लोक त्यांच्या बायकांना लपवत होते. मी लोकांकडे गेल्यावर लोक मला ख-या आयुष्यातही खलनायकच समजत होते. पण ही गोष्ट कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. मी काम चांगले करतोय, याचे मला समाधान लाभत होते." 


करिअरमध्ये दिले होते 250 रेप सीन...
- प्रेम चोप्रा यांनी आपल्या करिअरमध्ये 'शहीद' (1965), 'बॉबी' (1973), 'बेताब' (1983), 'गुप्त' (1997) आणि 'कोई मिल गया' (2003) सह सुमारे 380 चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटांमध्ये त्यांनी एकुण 250 रेप सीन दिले होते. प्रेम चोप्रा यांना मात्र असे सीन करणे पसंत नव्हते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, "असे सीन करताना मी माझ्या को-अॅक्ट्रेसला विश्वासात घ्यायचो. सीन करताना काही बरंवाईट होऊ नये, याचा मी प्रयत्न करायचो. ऑन स्क्रिन इमेजमुळे माझी खासगी आयुष्यातील प्रतिमा मलीन होऊ नये, हे सतत माझ्या डोक्यात असायचे. जर चित्रपटांमध्ये खरंच गरज असेल, तरच रेप सीन टाकायला हवेत, असे माझे मत आहे. पण दुर्दैवाने कमर्शिअल चित्रपटांमध्ये गरज नसतानाही असे सीन टाकले जातात."


प्रेम चोप्रांना व्हायचे होते हीरो... 
- प्रेम चोप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, "इतर अभिनेत्यांप्रमाणेच मीदेखील सुरुवातीला इंडस्ट्रीत हीरो बनण्यासाठी आलो होतो. काही पंजाबी चित्रपटांमध्ये मी हीरोची भूमिका साकारली होती, जी लोकांनी पसंतही केली. पण ज्या हिंदी चित्रपटांमध्ये मी हीरो किंवा मध्यवर्ती भूमिका साकारल्या, ते चित्रपट फ्लॉप ठरले. चित्रपट फ्लॉप ठरल्याने इंडस्ठ्रीत जास्त संधी मिळाल्या नसल्या. त्यामुळे मी निगेटिव्ह भूमिका स्वीकारणे सुरु केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या भूमिकांमुळे मी हिट ठरलो."

बातम्या आणखी आहेत...