आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्यावर दारू-गांजा पार्टी करणाऱ्या 11 तरुणांची कपडे उतरवून काढली धिंड, मारहाण करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 जानेवारी रोजी रात्री 1 ते दुपारी 3 दरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आला समोर
  • यानंतर गुरुवारी नेरूळ पोलिसांनी 10 अज्ञातांविरुद्ध दाखल केला गुन्हा

मुंबई - मुंबईपासून जवळच असलेल्या माथेरान येथील पेब किल्ल्यावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दारू पार्टी करत असलेल्या 11 तरुणांना श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान सेनेचे कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांना अनेक तासांपासून बांधून ठेवत त्यांचे कपडे उतरवून त्यांना माफी मागायला लावली. 1 जानेवारी रोजी रात्री 1 ते 3 वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर गुरुवारी नेरुळ पोलिसांनी 10 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
शिवभक्तांनी आरोप केला की, पेब किल्ला त्यांच्यासाठी एक धार्मिक स्थळ आहे आणि हे सर्व तेथे दारू आणि गांजा पार्टी करत होते. व्हिडिओत पीडितांमधील काही जणांनी ही बाब स्वीकारली असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले की, गुरुवारी आम्ही याप्रकरणी 10 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थिती अशाप्रकारची मारहाण करणे चुकीचे आहे. श्री शिव प्रतिष्ठान ही संभाजी भिडे यांची मानली जाते. हे प्रतिष्ठान भीमा-कोरेगांव हिंसाप्रकरणी आरोपी आहे. मारहाण करणाऱ्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 506(02) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हा किल्ला एएसआयच्या कक्षेत येत नाही


श्री शिव प्रतिष्ठान सेनेच्या कल्याण शाखेचे प्रमुख अतुल भंडवालकर पाटील यांनी सांगितले की, आम्ही लोकांना किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची पार्टी करण्यास मनाई केली होती. ही मारहाण कोणी केली याबाबत माहिती मिळवत असल्याचे ते म्हणाले. मुंबई बंदी कायदा 1949 च्या कलम 140 अन्वये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई आहे. पेब किल्ला भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येत नाही. फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे किल्ल्याच्या देखरेखेचा अधिकार आहे. म्हणून येथे होणाऱ्या कोणत्याही घटनांवर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. देवीच्या नावावरून मिळाले किल्ल्याला नाव 

पेब किल्ला देवी पेबचे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते. या किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात झाली होती. किल्ल्यावर एक मंदिर देखील आहे. हा किल्ला ट्रेकर्ससाठी आवडते ठिकाण आहे.