Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | menopause and heart disease precautions tips in marathi

रजोनिवृत्तीत हृदयाशी संबंधित आजारांबाबत सुरक्षित राहा, हे उपाय ठरतील फायदेशीर 

हेल्थ डेस्क | Update - Jan 13, 2019, 12:53 PM IST

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती (मासिक पाळी) ही साधारणत: वयवर्षे 52 ते 54 या काळात होते, मासिक पाळी बंद झाल्यानंतर हृदयाशी नि

 • menopause and heart disease precautions tips in marathi

  मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती (मासिक पाळी) होय. ही महिलांमध्ये एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्ती ही साधारणत: वयवर्षे 52 ते 54 या काळात होते. वय जसे वाढते तशा आरोग्याच्या समस्याही उद‌्भवतात; परंतु महिलांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर हृदयाशी निगडित आरोग्य समस्या समोर येतात. यासोबत एस्ट्रोजन हार्मोन हळूहळू कमी होत जातो. एस्ट्रोजनचा स्तर बदलल्याने आरोग्य प्रभावित होते. रजोनिवृत्तीपूर्वी शरीरात एस्ट्रोजनचा स्तर अधिक असतो. त्यामुळे धमण्यांना कोणताही धोका किंवा नुकसान पोहाेचत नाही. जेव्हा एस्ट्रोजनचे उत्पादन कमी होते तेव्हा सुरक्षिततेची हमीही कमी होते. अशावेळी हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो. यासाठी महिलांनी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याशी निगडित समस्यांकडे दुर्लक्ष नको.


  जोखमीचे घटक
  जयपूरचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. हेमंत चतुर्वेदी यांंच्या मते, मासिक पाळीमुळे महिलांमध्ये एस्ट्रोजन नावाचे नैसर्गिक हार्मोन कमी होत जाते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या प्रवाहाच्या भिंतींना नुकसान पोहाेचते आणि कठीण होऊन रक्तदाब वाढतो. सोबत महिलांच्या रजोनिवृत्तीनंतर हार्माेन्सच्या असंतुलनामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. एस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरोन हार्मोन कमी-अधिक झाल्याने हृदयाची धडधड अनियमित होऊन वाढून जाते. ज्याला अरिथमिया म्हटले जाते.


  या सवयी असतील फायदेशीर :
  - फळे, भाज्या आणि कडधान्याचा रोजच्या आहारात समाविष्ट करा, सोयाबीनपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर करा, अधिक स्निग्ध आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा.
  - रोज ४० मिनिटे अधिक वेगात पायी चाला. फिरल्याने व्यायाम होतो. जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि खास एक्सरसाइज सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
  - वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराचे पथ्य पाळा, रजोनिवृत्तीनंतर शरीराचे वजन वाढून स्थूलता येते.

Trending