Home | International | Other Country | Mentawai Tribe of Sumatra Where Teeths of Womans Are Reshaped in Risky & Dangerous Manner

मुली सुंदर दिसण्यासाठी येथे वापरतात एवढी भयंकर पद्धत, पाहणाऱ्यांचा उडतो थरकाप, कट्यारीसारखे टोकदार केले जातात दात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 11:57 AM IST

इंडोनेशियातील छोटेसे बेट आहे सुमात्रा. येथे मेन्टावैन्स नावाची अनोखी प्रजाती आढळते.

 • Mentawai Tribe of Sumatra Where Teeths of Womans Are Reshaped in Risky & Dangerous Manner

  इंडोनेशिया - इंडोनेशियातील छोटेसे बेट आहे सुमात्रा. येथे मेन्टावैन्स नावाची अनोखी प्रजाती आढळते. येथे सुंदर दिसण्यासाठी असे भयंकर काम केले जाते की, पाहणाऱ्यांचा थरकाप उडतो. वास्तविक, येथे महिला आणि पुरुषांच्या दातांना धारदार हत्याराने टोकदार आकार दिला जातो. ते एवढे टोकदार बनवतात की, हे दातं कट्यारीसारखे दिसू लागतात.

  हे आहे असे करण्याचे कारण...
  - येथील लोकांचे असे मानणे आहे की, महिलांचे सौंदर्य आणखी वाढते, यामुळे पुरुष त्यांच्याकडे आकर्षित होतात. परंतु यामुळे महिलांचा जीव धोक्यातही पडतो. तेव्हा असह्य वेदना सहन कराव्या लागतात, अनेकदा खोल जखमा आणि इन्फेक्शनही होते. असे असूनही ही भयंकर परंपरा अद्याप सुरू आहे.


  दुसरे कारण मांसाहार
  - दातांना आपल्या मर्जीप्रमाणे टोकदार करण्याचे काम पुरुषही करतात. असे मानले जाते की, ही प्रजाति मांसाहारासाठीही दातांना एवढा टोकदार आकार देते. यात ते मांसाला सहजपणे खाऊ शकतात.

  फोटोग्राफरने समोर आली ही जमाती
  - सोशल मीडियाच्या काळात 19 वर्षीय एक फोटोग्राफर मोहम्मद फॉजी चैनिआगोमने इंडोनेशियाच्या पश्चिमी सुमात्रामध्ये राहणाऱ्या जमातीचे फोटोज क्लिक केले होते. मोहम्मदने सर्वात आधी या ट्राइबची कहाणी सोशल मीडियावर टाकली होती.

  - उत्तर सुमात्रामध्ये राहणाऱ्या फोटोग्राफरने जमातीसोबत 4 दिवस घालवले आणि त्यांच्या आयुष्याला जवळून पाहिले. या जमातीला मेन्टावाई ट्राइब नावाने ओळखले जाते. ते आपल्या शरीरावर खास प्रकारचे टॅटू बनवणे पसंत करतात. जी आता त्यांची ओळख बनलेली आहे.


  कवट्यांनी सजवतात घरे
  यांची घरे बांबू, लाकूड आणि गवताने बनलेली असतात. त्यांना उमाज असे म्हणतात. हे लोकं घरात शिकार करून आणलेल्या जनावरांच्या कवट्या सजवून ठेवणे पसंत करतात. मॉडर्न जगापासून यांनी स्वत:ला अलिप्त ठेवलेले आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 • Mentawai Tribe of Sumatra Where Teeths of Womans Are Reshaped in Risky & Dangerous Manner
 • Mentawai Tribe of Sumatra Where Teeths of Womans Are Reshaped in Risky & Dangerous Manner
 • Mentawai Tribe of Sumatra Where Teeths of Womans Are Reshaped in Risky & Dangerous Manner

Trending