आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाती-धर्माचा उल्लेख करून एकात्मतेला बाधा आणली तर 5 वर्षांची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर : निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता म्हटल्यानंतर ढाेबळमानाने काही नियमांपुरते पाहिले जाते. उल्लंघनाचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या माध्यमातून याबाबतचे खटले न्यायलयात चालतात. त्याचे स्वरूप कसे आहे, गुन्हा सिद्ध झालाच तर काय शिक्षा आहे, याबाबतची माहिती जाणून घ्या.

निवडणुकीसंबंधीचे हे गुन्हे आणि शिक्षेबद्दलच्या तरतुदी
१. मतदाराला आमिष दाखवणे, मग ते पैशाच्या किंवा वस्तूच्या रूपाने असेल, भारतीय दंडविधान कलम १७१ बी आणि १७१ ई, एक वर्ष कैद किंवा दंड अथवा दाेन्ही.
२. उमेदवाराला धमकी देणे, धाक दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडणे, भादंवि कलम १७१ सी, १७१ फ, एक वर्ष कैद किंवा दंड अथवा दोन्हीही
३. दुसऱ्याच्या नावाने मतदान करणे, अदखलपात्र, गुन्हा व अटक होते
४. उमेदवाराच्या चारित्र्यावर बोलणे, अदखलपात्र, दंडाची तरतूद आहे
५. परवानगीशिवाय प्रचार, खर्च करणे, अदखलपात्र, ५०० रुपये दंड
६. खर्चाचा हिशेब न ठेवणे, न देणे, अदखलपात्र, ५०० रु. दंड
७. जाती-धर्माचा उल्लेख करून एकात्मतेला बाधा अाणणे, तीन वर्षांची शिक्षा
८. भय निर्माण करणारा मजकूर छापून ते मतदारांना वाटणे, ३ वर्षांची शिक्षा, दंड

निवडणुकीसंबंधी भ्रष्टाचार : मतदान केंद्रच ताब्यात घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास होऊ शकते तीन वर्षांची शिक्षा
१. उमेदवारी मागे घेण्यासाठी लाच लाेकप्रतिनिधी कायदा १९५१ कलम १२३ नुसार अदखपात्र गुन्हा नाेंद हाेईल. पाेलिस तपास करून अहवाल पाठवतील.
२. प्रचारात धार्मिक आणि राष्ट्रीय चिन्हांचा वापर करणे हा माेठा अपराध असून, पाेलिस तत्काळ गुन्हा दाखल करतील. कलम १२५ अन्वये तीन वर्षांची शिक्षा या प्रकरणात हाेईल.
३. माघार घेतली म्हणून प्रचार करणे न्यायालयाची परवानगी घेऊन पाेलिस पुढील कारवाई करतील. गुन्हा अदखलपात्र आहे. १२३ (४) हा कलम आहे.
४. मतदानासाठी मतदारांची ने-आण करणे न्यायालयाची परवानगी घेऊनच पाेलिस पुढील तपास करतील. पण, पाेलिस कलम १२३ (५) नुसार गुन्हा होईल.
५. निवडणुकीत फायद्यासाठी शासन कर्मचाऱ्याचा उपयाेग करून घेण हा निवडणुकीतील गैरप्रकार आहे. पाेलिस त्याची नाेंद घेऊन आयाेगाकडे अहवाल पाठवणार.
६. मतदान केंद्रच ताब्यात घेणे तत्काळ गुन्हा दाखल हाेईल. भारती दंड विधानाच्या कलम १२३ (८) नुसार न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करतील. सिद्ध झाल्यास ३ वर्षांची शिक्षा, दंड.
७. शासकीय कर्मचाऱ्याने एखाद्या उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम पाहणे अदखलपात्र गुन्हा आहे. सिद्ध झाल्यास तीन महिन्यांची कैद आणि दंड हाेईल.
८. मतदान केंद्राकडे शस्त्रे किंवा हत्यारे घेऊन जाणे पाेलिस तातडीने गुन्हा दाखल करतील. अटक करून न्यायालयापुढे उभे करतील. यात २ वर्षांची शिक्षा आणि दंड हाेईल.